शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात! घरच्यांचा विरोध पण कोर्टाची परवानगी; प्रीती अन् काजल करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 19:56 IST

दोन मैत्रिणी एकमेकांसोबत सातफेरे घेणार आहेत.

उत्तर प्रदेशातील बिजनोर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील दोन मैत्रिणी एकमेकांसोबत सातफेरे घेणार आहेत. दोन्ही कुटुंबीयांनी समजावून देखील काजल आणि प्रीती त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या. घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी धाडसी निर्णय घेत घर सोडले. मुलींनी अखेरपर्यंत कोणाचेच न ऐकल्याने कुटुंबीयांना देखील होकार द्यावा लागला. कोर्टाने देखील दोघींना एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. 

बिजनोर येथील एका गावातील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. येथील प्रीती उत्तराखंड इथे एका फॅक्टरीत काम करायची. तिथेच तिची मैत्री मुरादाबाद येथील काजलसोबत झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी दोन्हीकडील कुटुंबीयांचा विरोध होता. घरच्यांचा वाढता विरोध पाहता प्रीती आणि काजल ५ दिवस घरातून फरार झाल्या. यानंतर प्रीतीच्या वडिलांनी स्थानिक पोलिस स्थानकात काजलविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलींचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुरूवारी या दोघी पोलिसांच्या पथकाला सापडल्या. पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांना बोलावून त्यांची समजूत काढली. 

मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात!दरम्यान, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर देखील प्रीती आणि काजल या एकत्र राहण्यावर ठाम होत्या. त्या कोणत्याही परिस्थितीत एकमेकांपासून दूर राहण्यास तयार नव्हत्या. जबरदस्ती केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना बिजनोर सीजेएम कोर्टात हजर करण्यात आले. जिथे दोघींचे जबाब नोंदवण्यात आले. कोर्टातही प्रीती आणि काजल यांनी एकत्र राहण्यावर ठाम असल्याचे सांगितले. नंतर दोघीही लग्नासाठी पात्र असल्याची खात्री झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची परवानगी दिली. 

प्रीती अन् काजल करणार लग्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली घरातून निघून गेल्या होत्या. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना सीजेएम न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे कलम १६४ अंतर्गत दोघींचेही जबाब घेण्यात आले. त्या दोघीही एकत्र राहण्यावर ठाम आहेत. त्यावर न्यायालयाने दोघींनाही प्रौढ मानले आणि त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची परवानगी दिली. यानंतर दोन्ही मुली एकत्र निघून गेल्या. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या कुठे गेल्या आहेत हे सांगणे योग्य ठरणार नाही, असेही पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नCourtन्यायालयPoliceपोलिस