शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 12:12 IST

PM Narendra modi varanasi lok sabha election 2024 nomination : गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, मी येथे आलो नाही, मला येथे आणले गेले आहे. माता गंगेने मला बोलावले आहे. आता मोदी म्हणाले माता गंगेने मला दत्तक घेतले आहे.

वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईच्या आठवणीने भावूक झाले. त्यांच्या आई हिराबेन मोदी यांचे 30 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले आहे. आईच्या  निधनानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच निवडणूक आहे. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी आज तक या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती मोदी म्हणाले, 400 पार ही देशाची भावना आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला. तसेच, माझ्या आईच्या निधनानंतर, गंगा हीच माझी आई आहे आणि मला 'गंगा मय्या'ने दत्तक घेतले आहे, असेही मोदी म्हणाले.

गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, मी येथे आलो नाही, मला येथे आणले गेले आहे. माता गंगेने मला बोलावले आहे. आता मोदी म्हणाले माता गंगेने मला दत्तक घेतले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आपल्या आईच्या आठवणीने भावूक झाले. यापूर्वी, मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करत असत. मात्र यावेळी त्यांची आई नाही.

राहुल गांधींवर निशाणा -यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "केरळने त्यांना ओळखले आहे, केरळने त्यांना पळवून लावले आहे. वायनाडमधून पळून ते आता रायबरेलीत पोहोचले आहेत. केरळमधून पळवून लावल्यानंतर, त्यांची भाषा बदलली आहे." राहुल गांधी यावेळी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर एकाचवेळी निशाणा साधला. हे दोघे यापूर्वीही सोबत आले होते. यूपीच्या जनतेने या दोघांनाही ओळखले आहे. ते एकत्र आल्याने भाजपला काही फरक पडणार नाही.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा