शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पडद्यावरील रामाला खऱ्या रावणाच्या सासरी आव्हान; भाजपची नवीन खेळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 07:26 IST

भारतीय जनता पक्षाने मेरठमध्ये तीन वेळचे खासदार राजेंद्र अगरवाल यांना बाजूला बसविण्याचा डाव खेळला आहे.

ललित झांबरे, लोकमत न्यूज नेटवर्कमेरठ : भारतीय जनता पक्षाने मेरठमध्ये तीन वेळचे खासदार राजेंद्र अगरवाल यांना बाजूला बसविण्याचा डाव खेळला आहे. त्याचवेळी भाजपने छोट्या पडद्यावरील ‘राम’ अर्थात अरुण गोविल यांच्यावर बाजी लावली आहे. रावणाच्या सासूरवाडीत प्रभू श्रीराम उमेदवार असे हे मनोरंजक चित्र आहे. समाजवादी पार्टीच्या सुनीता वर्मा प्रधान व बहुजन समाज पार्टीचे देवव्रत त्यागी हे प्रमुख विरोधी उमेदवार आता या कलावंत रामाला कशी लढत देतात, याची देशभर उत्सुकता आहे. 

समाजवादी पार्टीने भानुप्रताप सिंग व आमदार अतुल प्रधान असे दोन उमेदवार बदलून मेरठच्या माजी महापौर सुनीता वर्मा प्रधान यांना उमेदवारी दिली. शेवटच्या क्षणाचा हा बदल अतुल प्रधान यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारला. तर बसपाचे देवव्रत त्यागी यांचा मागास व मुस्लिमांच्या मतांवर जाेर आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • साक्षात राम आमच्याकडे मत मागण्यासाठी आले आहेत. त्यांना आम्ही निराश कसे करू शकतो, या भावनिक मुद्याला भाजपने हात घातला आहे. 
  • गेल्यावेळी भाजपचा उमेदवार येथून फक्त ४ हजार मतांच्या फरकाने जिंकून आला होता. गेल्यावेळी बसपा आणि सपा यांच्यासह राष्ट्रीय लोकदल सोबत होते. यावेळी बसपा व सपा दोघेही स्वतंत्र लढत आहेत मतविभाजनाचा भाजपला फायदा हाेऊ शकताे. तसेच यावेळी लोकदल भाजपसोबत आहे. 

२०१९ मध्ये काय घडले ?राजेंद्र अगरवाल भाजप (विजयी) ५,८६,१८४ हाजी मोहम्मद याकूब बसप ५,८१, ४५५

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा