शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
3
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
6
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
7
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
8
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
10
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
11
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
12
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
13
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
14
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
15
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
16
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
17
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
18
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
19
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
20
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
Daily Top 2Weekly Top 5

योगींच्या सरकारमधील मंत्री नंदी यांच्या मुलगा आणि सुनेच्या कारचा भीषण अपघात, १९ दिवसांपूर्वीत झालं होतं लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 20:58 IST

UP Minister Nand Gopal Nandi son Road Accident: उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री नंद गोपाल नंदी यांचा मुलगा अभिषेक गुप्ता आणि सून कनिष्का यांच्या कारला आज कन्नौज येथे भीषण अपघात झाला.

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री नंद गोपाल नंदी यांचा मुलगा अभिषेक गुप्ता आणि सून कनिष्का यांच्या कारला आज कन्नौज येथे भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त झालेली कार नंद गोपाल नंदी यांचा मुलगा चालवत होता. ही कार अनियंत्रित होऊन डिव्हायडरवर आदळली आणि उलटली. या अपघातात कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात नंद गोपाल नंदी यांचा मुलगा आणि सून जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

नंदी यांचा मुलगा अभिषेक याचा विवाह ११ जुलै रोजी झाला होता. तसेच वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. अपघातानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोघांनाही कारमधून बाहेर काढले. मात्र या दोघांनाही फार दुखापत झाली नाही. घटनास्थळावरील एक फोटोही समोर आला आहे. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी दोघांनाही उपचारांसाठी लखनौ येथील पीजीआय येथे दाखल केले. 

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पाऊस पडल्याने रस्ता निसरडा झालेला होता. मात्र हा अपघात कुठल्या कारणामुळे झाला हे सांगू शकत नाही. जखमींना रुग्णवाहिकेमधून लखनौ येथे पाठवण्यात आलं आहे. नंद गोपाल नंदी हे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये औद्योगिक विकासमंत्री आहेत. नंद गोपाल नंदी यांच्यावरही एकदा जीवघेणा हल्ला झाला होता, त्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात