शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

त्रिवेणी संगमावर २ कोटी भाविकांचे पवित्र स्नान; सरकारकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:15 IST

महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने ऑपरेशन चतुर्भुज अभियान सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. 

महाकुंभनगर (प्रयागराज) : महाकुंभमेळ्यातील पाचवे स्नान उत्सव पर्व असलेल्या माघ पौर्णिमेच्या निमित्ताने बुधवारी दुपारी १२:०० वाजेपर्यंत २ कोटींहून अधिक लोकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. त्यामुळे महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्रिवेणी संगमावर स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ४८.२५ कोटींहून अधिक झाली आहे. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने कल्पवास अर्थात ध्यानधारणा करणाऱ्या दहा लाखांहून अधिक भाविकांनी आपला संकल्प पूर्ण केला. माघ पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी बुधवारी पहाटेपासून लाखो महिला, पुरुष, वृद्ध व लहान मुलांची गंगा व संगमाकडे रिघ सुरू होती.

गत पौर्णिमेला कल्पवास सुरू करणाऱ्या १० लाखांपेक्षा अधिक भाविकांनी माघ पौर्णिमेदिवशी त्रिवेणी संगमावर स्नान करत आपला संकल्प पूर्ण केला. भाविकांची  ये-जा सुरळीत होत आहे. आम्ही गर्दीच्या सर्व ठिकाणी खबरदारी घेत असून, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने ऑपरेशन चतुर्भुज अभियान सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. 

अनिल कुंबळे यांचा ‘व्हीआयपी’ला फाटामाजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी इतर भाविकांप्रमाणे पत्नी चेतना रामतीर्थसह संगमात स्नान केले. व्हीआयपी प्रोटोकॉलशिवाय ते पत्नीसह बोटीने संगमावर गेले आणि स्नान करत सूर्यदेवाला अर्घ्य दिले. तसेच चित्रपट अभिनेते सुनील शेट्टी यांनीही संगमात स्नान केले.

वाहतूककोंडी टाळण्यासाठी खबरदारी महाकुंभमेळ्यानिमित्त लाखो वाहने प्रयागराजच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.वाहनांना संबंधित मार्गावरील पार्किंगमध्ये थांबवण्यात येत आहे. प्रयागराजमध्ये वाहनांची कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश