यावेळी महाकुंभमध्ये 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. यातून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत रेव्हेन्यू जनरेशन वाढण्याचा अंदाज आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी म्हटले आहे. अधिकृत निवेदनानुसार, एका आघाडीच्या माध्यम समूहाने आयोजित केलेल्या 'Divine Uttar Pradesh: The Must Visit Sacred Journey' सम्मेलनात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले.
महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 2019 च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. एवढेच नाही तर, 2024 मध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत वाराणसीमध्ये काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी 16 कोटीहून अधिक भाविक आले. तर अयोध्येत 13.55 कोटीहून अधिक भाविक आले आहेत, असेही मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.
एका प्रेस नोटद्वारे मुख्यमंत्री म्हणाले, "13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या महाकुंभमेळ्यामुळे जागतिक पातळीवर भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना महत्त्व मिळेल. तसेच, महाकुंभचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व सांगताना ते म्हणाले, हे आयोजन म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सामाजिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतिकही आहे. यावेळी, हा महाकुंभ म्हणजे, जगातील सर्वात मोठे अस्थायी शहर आहे, येथे कुठल्याही क्षणी 50 लाक ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता आहे," असेही योगी म्हणाले.
कुंभमेळ्याव्याची तयारी - संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संगमच्या 12 किलोमीटर परिसरात स्नान घाट तयार केले जात आहेत. स्वच्छता, बांधकाम आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. याशिवाय सर्व घाटांवर प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे."
जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, "महिलांसाठी सर्व घाटांवर स्वतंत्र चेंजिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घाटावर वेगवेगळे चिन्ह (डमरू, त्रिशूळ इ.) लावण्यात आले आहेत." जेणेकरून लोकांना ते सहजपणे ओळखता येतील." या शिवाय, महाकुंभाला होणाऱ्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. संगम परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारले जात आहेत आणि सर्व घाटांवर पाण्याला बॅरिकेडिंगचीव्यवस्था केली जात आहे.