शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 14:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावकांमध्ये आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, बैजनाथ पटेल, लालचंद कुशवाह आणि संजय सोनकर यांच्या नावांचा समावेश आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते 2014 पासून येथून निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी, माता गंगेचे पूजन केले आणि कालभैरवाचं दर्शनही घेतलं. मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करतान्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, एकनाथ शिंदे, चंद्राबाबू नायडू, संजय निषाद, ओम प्रकाश राजभर, आसामचे नेते प्रमोद बोरा, हरदीप सिंग पुरी आदी नेते मंडळी पोहोचले होते.

हे आहेत पंतप्रधान मोदींचे प्रस्तावक -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावकांमध्ये आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, बैजनाथ पटेल, लालचंद कुशवाह आणि संजय सोनकर यांच्या नावांचा समावेश आहे. - आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड - यांनी श्रीराम मंदिरात रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढला होता आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे मुख्य पुजारीही होते.- बैजनाथ पटेल - जनसंघापासूनचे कार्यकर्ते आहेत. - संजय सोनकर - संजय सोनकर हे वाराणसी भाजपचे जिल्हा महामंत्री आहेत.

26 नावांवर झाली होती चर्चा -केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी ही चारही नावे निश्चित केली आहे. पक्षाने 26 जणांची निवड केली होती. यानंतर ही नावे पीएम मोदीकडे पाठवण्यात आली होती. यानंतर अमित शाह यांनी महमूरगंजमधील तुलसी उद्यान येथे असलेल्या मोदींच्या केंद्रीय निवडणूक कार्यालयात या नावांवर कोअर कमिटीसोबत चर्चा केली होती.

2019 मध्ये कोण होते प्रस्तावक -विज्ञानी रमाशंकर पटेलशिक्षाविद् प्रो. अन्नपूर्णा शुक्लाडोमराजा जगदीश चौधरीभाजपचे दुने कार्यकर्ते सुभाष गुप्ता

2014 मध्ये कोण होते प्रस्तावक -महामना मदन मोहन मालवीय यांचे नातू गिरधर मालवीयशास्त्रीय गायक पं. छन्नूलाल मिश्रानाविक भद्र प्रसाद निषादबुनकर अशोक कुमार

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाVaranasiवाराणसी