शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 16:59 IST

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून भाजपने त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले आहे.

Lok Sabha Elections 2024 : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून भाजपने त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले. भाजपने ब्रिजभूषण यांचा मुलगा करण भूषण सिंहला कैसरगंज मतदारसंघातून तिकीट दिले आहे. आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी ब्रिजभूषण यांनी कंबर कसली असून, ते प्रचारात व्यग्र आहेत. विविध सभांच्या माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेले ब्रिजभूषण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

एका सभेला संबोधित करताना ब्रिजभूषण यांनी एका वर्षांपासून माझ्याविरोधात षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला. माझ्या शरीरावर एवढे हल्ले झाले आहेत की, माझे शरीर दगडाचे झाले आहे. पण मी अजिबात शांत राहू शकत नाही. त्यांनी मुस्लिमांना अनुसरून सांगितले की, कोणी म्हणू अथवा नको पण तुमचे आणि माझे रक्त एक आहे. आपला डीएनए एकच आहे. जर आपला डीएनए तपासला तर तो सारखाच असेल. यावेळी ब्रिजभूषण खूप भावूक दिसले.

ब्रिजभूषण शरण सिंह भावूक  तसेच ६०० किमी दूर असलेल्या हरयाणात बसलेले काही चेहरे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. त्यांना माझे राजकीय भविष्य अंधारात आणायचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मतांच्या माध्यमातून त्यांना चोख प्रत्युत्तर द्या. १९९६ मध्ये देखील यापद्धतीचे षडयंत्र रचण्यात आले होते आणि आता देखील हे होत आहे. एका वडिलांसाठी आपला मुलगा खासदार व्हावा यापेक्षा कोणती मोठी बाब नाही. माझ्या मुलाचे वय ३३ वर्ष असून मी देखील ३३ व्या वर्षी खासदार झालो होतो, असेही ब्रिजभूषण यांनी सांगितले. 

दरम्यान, कैसरगंज लोकसभा मतदारसंघात गोंडा, तारबगंज, कर्नलगंज, कटरा या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच बहराइच जिल्ह्यातील कैसरगंज आणि पायगपूर या दोन विधानसभा मतदारसंघातील मतदार देखील कैसरगंजचा खासदार ठरवतात. २००९ मध्ये समाजवादी पक्षाकडून ब्रिजभूषण निवडून आले. त्यानंतर ते २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर विजयी झाले.

टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश