शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

...म्हणून या गावात लग्नासाठी कुणी मुलगी देईना, संतप्त अविवाहित तरुणांनी केली मतदानावर बहिष्काराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:09 IST

Lok Sabha Election 2024: सुमारे ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागातील ग्रामस्थांनी आता जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईल ही आवश्यक बाब बनली आहे. लोक मोबाइलच्या माध्यमातून अनेक गोष्टी घरबसल्या करत असतात. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मोबाइल हा आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील बहराइचमध्ये एक असा भाग आहे जेथील सुमारे ३० हजारांहून अधिक लोक मोबाइलशिवाय जीवन जगत आहेत. या भागात राहणाऱ्या लोकांना आता त्यांचे नातेवाईकही टाळू लागले आहेत. एवढंच नव्हे तर या भागातील तरुणांसोबत लग्न करण्यासही तरुणी तयार होत नाही आहेत.

हा भाग बहराइच जिल्ह्यातील मोतीपूर तालुक्यातील इंडो-नेपाळ सीमा परिसरात आहे. या भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सरकारकडून अनेक योजनांचा लाभ मिळतो. मात्र दूरसंचार व्यवस्था नसल्याने हा भाग बाह्य जगापासून तुटला आहे. मोबाइल नेटवर्कच्या समस्येबाबत येथील रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार झाले आहेत. मात्र या समस्येवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सुमारे ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागातील ग्रामस्थांनी आता जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

या भागात बर्दिया, आमा, विशुनापूर, फकीरपुरी, बिछिया, रमपुरवा मटेही, भवानीपूर, कैलाश पुरी, भरथारपूर या गावांचा समावेश होतो. तसेच इथे सुमारे ३० हजारांहून अधिक ग्रामस्थ राहतात. ते सातत्याने मोबाइलच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येचा सामना करत आहेत. या गावांमधील सरपंचांनीही ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.  

येथील ग्रामस्थांना सरकारी योजनांमधून खूप लाभ मिळाला आहे. मात्र येथे मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. बिछिया येथे बीएसएनएलचा एक टॉवर आहे. मात्र तो कार्यान्वित झालेला नाही, आता येथील ग्रामस्थांकडून खाजगी कंपनीचा टॉवर लावण्याची मागणी केली जात आहे. येथील ग्रामस्थांनी आपली समस्या मांडताना सांगितलं की, येथे राहत असलेल्या तरुण तरुणींना लग्न करण्यासाठी जोडीदार मिळत नाही आहे. जे नातेवाईक आहेत. त्यांचं नातेवाईकांशी बोलणं होत नाही आहे. आम्ही लोक देश आणि जगापासून तुटलेले आहोत, अशी व्यथाही या लोकांनी मांडली.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश