शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून सतत भांडण, पत्नीला संपवून पतीची आत्महत्या, प्रेमाचा भयंकर शेवट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:52 IST

Uttar Pradesh Kushinagar Crime: रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या करून स्वतःचं आयुष्य संपवलं. अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लव्ह मॅरेजचा अंत झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील तरयासुजन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बधाई टोला येथे एका पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशय आणि रागाच्या भरात घडलेल्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अरुण शर्मा आणि त्याची पत्नी नेहा भारती यांच्यात जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात अरुणने भाजी कापण्याच्या धारदार विळ्याने नेहाचा गळा चिरला. नेहा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर, अपराधीपणाच्या भावनेतून किंवा भीतीने अरुणने त्याच खोलीत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

अरुण आणि नेहा यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत असतानाच, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले होते. संशय आणि सततच्या वादांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. अखेर याच रागाने दोन तरुण जीवांचा बळी घेतला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताने माखलेले शस्त्र आणि इतर पुरावे गोळा केले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Suspicion-Fueled Fight: Husband Kills Wife, Commits Suicide in Tragic End

Web Summary : In Uttar Pradesh, a husband murdered his wife following frequent arguments fueled by suspicion. Overwhelmed, he then committed suicide. The couple had a love marriage last November, but constant suspicion led to tragedy. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश