प्रेम माझ्याशी अन् लग्न दुसरीशी; प्रेयसी संतापली, प्रियकराच्या लग्नात घातला एकच राडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 05:28 PM2024-04-24T17:28:52+5:302024-04-24T17:29:11+5:30

इतर मुलीसोबत लग्न करणाऱ्या प्रियकराच्या लग्नात प्रेयसीने चांगलाच गोंधळ घातला.

  In Uttar Pradesh's Ballia, an angry girlfriend committed an acid attack after her boyfriend married another girl | प्रेम माझ्याशी अन् लग्न दुसरीशी; प्रेयसी संतापली, प्रियकराच्या लग्नात घातला एकच राडा!

प्रेम माझ्याशी अन् लग्न दुसरीशी; प्रेयसी संतापली, प्रियकराच्या लग्नात घातला एकच राडा!

प्रेमात धोका देऊन इतर मुलीसोबत लग्न करणाऱ्या प्रियकराच्या लग्नात प्रेयसीने चांगलाच गोंधळ घातला. उत्तर प्रदेशातील बलिया येथील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. इथे लग्नाचा कार्यक्रम सुरू असताना त्याच्या प्रेयसीने सिड हल्ला करताच एकच खळबळ माजली. या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. हल्ला करून संबंधित प्रेयसीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांनी तिला पकडले. माहिती मिळताच पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले. आरोपी प्रेयसी तिच्या प्रियकराच्या लग्नामुळे नाराज होती आणि याचाच बदला घेण्यासाठी तिने हे पाऊल उचलले. 

नवरदेवावर सिड फेकल्याने एकच गोंधळ उडाला. लग्नाचा विधी सुरू असताना अचानक एक महिला तिथे पोहोचली आणि तिने राडा घातला. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. नवरदेवाला किरकोळ दुखापत झाल्याने त्याला लगेच सोडण्यात आले. 

...अन् प्रेयसी संतापली
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बांसडीहरोड पोलीस घटनास्थळी पोहोचले. बघ्यांची गर्दी जमली होती. त्यांनी आरोपी तरूणीला पोलिसांच्या ताब्यात दिले. तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चौकशी करत आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरूणी आणि नवरदेव हे एकाच गावातील रहिवासी आहेत. दोघांमध्ये काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता डुमरी या गावात राकेश बिंद याच्या लग्नाची वरात बेल्थरा रोडवरून जाणार होती. पण, गावातील एक तरूणी जी राकेशची प्रेयसी आहे असे सांगितले जात आहे, तिने सिड हल्ला करून नवरदेवाला जखमी करण्याचा प्रयत्न केला. जखमींना नातेवाईंकांनी उपचारासाठी नेले मग वरात काढण्यात आली. नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title:   In Uttar Pradesh's Ballia, an angry girlfriend committed an acid attack after her boyfriend married another girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.