शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्यासाठी जीव देईन... प्रेयसीने प्रियकराला चक्क पुलावरुन नदीत ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 17:56 IST

कोलाघाट पुलावर शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. मिर्झापूर तालुक्यातील उदयपूर भूडा गावची तरुणी आपल्या बहिणीच्या प्रियकरासोबत बाईकवरुन जलालाबाद येथे जात होती

उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूरच्या मिर्झापूर येथून धक्कादायक प्रेम प्रकरणाचा उलगडा झाला आहे. येथे आपल्या प्रेयसीच्या प्रेमासाठी नदीत उडी घेण्याची टिंगल किंवा गंमत जीवावर बेतली असती. कारण, प्रेयसीने गंमती-गमतीत प्रियकराला धक्का दिला. त्यानंतर, प्रियकर उंचावरुन नदीत पडला. पण, सुदैवाने गावकऱ्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. सध्या त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रेयसी आणि तिच्या बहिणीली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कोलाघाट पुलावर शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. मिर्झापूर तालुक्यातील उदयपूर भूडा गावची तरुणी आपल्या बहिणीच्या प्रियकरासोबत बाईकवरुन जलालाबाद येथे जात होती. त्यावेळी, कोलाघाट पुलावर तरुणीची तिच्या प्रियकरासोबत भेट झाली. तो जलालाबादच्या मालूपूर येथील रहिवाशी असून तो विवाहित आहे. एकमेकांची भेट झाल्यानंतर हे तिघेजण पुलावर उभे राहून गप्पा मारत होते. 

प्रियकराने प्रेयसीला म्हटले की, मी तुझ्यासाठी रामगंगा नदीत उडी घेऊन जीव देऊ शकतो. त्यानंतर, तो पुलाच्या रेलींग कठड्यावर चढला. तरुण नाटक करत असल्याच्या समजातून तरुणीने प्रियकराला धक्का दिला. त्यामुळे, तो युवक थेट नदीत खाली कोसळला. तरुण नदीत बुडत असल्याचे लक्षात येताच, तरुणीने मोठ-मोठ्याने मदतीसाठी आवाज दिला. त्यावेळी, स्थानिकांनी नदीजवळ गर्दी केली, त्यापैकी काहींनी नदीत उडी घेत त्या युवकाला पाण्यातून बाहेर काढले. 

दरम्यान, घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, युवकाला सीएचसी जरीन आरोग्य केंद्रात घेऊन गेली. तेथून फर्रुखाबाद येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तरुणी आणि तिच्या बहिणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, ही घटना गंमती-गंमतीत घडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.  

टॅग्स :riverनदीPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टUttar Pradeshउत्तर प्रदेश