शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

भीषण अपघात, टायर फुटला आणि डंपरला धडकून कारला लागली आग, ८ जणांचा जळून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 08:22 IST

Bareilly Car Accident: उत्तर प्रदेशमधील बरेली येथे शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला असून, या अपघातात कारमधून प्रवास करत असलेल्या ८ जणांचा जळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बरेली-नैनीताल महामार्गावर शनिवारी रात्री ११ वाजता झाला.

 उत्तर प्रदेशमधील बरेली येथे शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला असून, या अपघातात कारमधून प्रवास करत असलेल्या ८ जणांचा जळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बरेली-नैनीताल महामार्गावर शनिवारी रात्री ११ वाजता झाला. मारुती इर्टिगा कारचा टायर फुटून ती डिव्हायडर ओलांडून पलीकडून जाणाऱ्या डंपरला धडकली. अपघातानंतर कार लॉक झाली आणि तिला आग लागली. यात कारमधून प्रवास करत असलेल्या आठ जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. 

अपघाताचे वृत्त समजल्यानंतर एसएसपी बरेली आणि आयजी बरेली रेंज डॉ. राकेश कुमार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नपूर्वक आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांपैकी तीन जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार कारमधील प्रवासी हे एक लग्न समारंभ आटोपून घरी परतत होते. त्यावेळीच हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना बरेलीचे एसएसपी सुशील चंद्रभान घुले यांनी सांगितले की, महामार्गावरील भोजीपुराजवळ कार ट्रकवर आदळून हा अपघात झाला. त्यानंतर कार फरफटत गेली आणि तिला आग लागली. तसेच अपघातानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने आतील प्रवासी अडकून पडले आणि आगीमध्ये जळून त्यांचा मृत्यू झाला. प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पुढील कारवाई सुरू आहे. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार