शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२२ जानेवारीला शाळा-कॉलेजेसना सुट्टी, वाईनशॉपही बंद; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 18:11 IST

२२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, अयोध्येत सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत १७ लाख भाविकांचा मेळा जमणार असल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सरकारने सुरक्षा व्यवस्थाही तैनात केली असून आर्मीसह, एनएसजी कमांडो आणि स्नायपरही तैनात असणार आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर देशभरात राम मंदिर सोहळ्याचा उत्साह असल्याने २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात आता युपीतील योगी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

२२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी. तसेच, या दिवशी मद्यविक्रीलाही बंदी घालण्यात आली असून वाईन शॉप बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित विभागांना दिले आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत मोठा उत्सव असून देशभरात हा सोहळा साजरा होणार आहे. त्यामुळे, इतरही राज्यांतील सरकारकडे या सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी होत आहे. महाऱाष्ट्रातही भाजपा नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातही २२ जानेवारी रोजी शाळा व कॉलेजेसना सुट्टी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. 

देशभरात २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह असून बाजारातही चांगलीच रेलचेल पाहायला मिळत आहे. या एका दिवशी तब्बल ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापारी संघटनेच्या प्रमुखांनी वर्तवला आहे. त्यामुळे, राम जन्मभूमी सोहळ्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. तूर्तात युपीतील योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

महाराष्ट्रातून ८८९ जणांना निमंत्रण

दरम्यान, महाराष्ट्रातून एकूण ८८९ जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये ५३४ विशेष निमंत्रित आहेत.  त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील ३५५ साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSchoolशाळा