उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 09:18 AM2023-06-18T09:18:31+5:302023-06-18T09:18:59+5:30

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

heat wave in ballia at Uttar Pradesh 54 deaths in 72 hours, 23 people lost their lives on June 15 | उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव

उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन आणि गर्मीने कहर केला आहे. लोक गर्मीमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे घरातून बाहेर पडणेही अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटांचा त्रास जाणवत आहे. यातच, उत्तर प्रदेशातील बलिया येथील उष्णता आणि गर्मीमुळे रुग्ण आणि मृतांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. 

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. यांपैकी 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, हा आकडा केवळ जिल्हा रुग्णालयातील आहे. यावरूनच संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

आजमगड विभागातील अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ बीपी तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढला आहे. या मागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी लखनऊवरून एक चमू येत आहे. हाचा शोध घेईल. याशिवाय, जेव्हा उष्णता अथवा थंडी अधिक असते तेव्हा श्वसनाचा त्रास असलेले रुग्ण, मधुमेही, रक्तदाबाची समस्या असलेले रुग्ण यांना धोका वाढतो. त्यामुळे तापमान वाढीचा अशा रुग्णांवर परिणाम होऊ शकतो. कदाचित यामुळेही मृत्यू होत असावेत, अशेही ते म्हणाले.

तीन दिवसांत 400 रुग्ण दाखल - 
यासंदर्भात बोलताना प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. के. यादव म्हणणे. जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास चारशे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Web Title: heat wave in ballia at Uttar Pradesh 54 deaths in 72 hours, 23 people lost their lives on June 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.