शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:22 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे प्रेयसीला अन्य तरुणासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या तरुणाने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायकरीत्या या तरुणीच्या हत्येच्या प्रकरणाला वाचा फुटली. 

उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे प्रेयसीला अन्य तरुणासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या तरुणाने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायकरीत्या या तरुणीच्या हत्येच्या प्रकरणाला वाचा फुटली.  त्याचं झालं असं की, या तरुणीचा मृतदेह २३ दिवसांनंतर कबरीतून बाहर काढण्यात आला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवला गेला. या शवविच्छेदनाच्या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालामधून या तरुणीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. तसेच तिची हत्या ही तिच्या प्रियकरानेच केल्याची धक्कादायक माहितीही तपासातून  उघड झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याने प्रेयसीवर संशय असल्याने तिची हत्या केल्याचे कबूल केले.

ही घटना जहानाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणारी जाकिरा ही तिच्या कुटुंबीयांसह नेपाळमध्ये मजुरी करण्यासाठी गेली होती. तर जाकिरा हिची मुलगी शिरी ही पिलीभीतमध्ये तिच्या आजी आजोबांकडेच राहत होती. १३ एप्रिल रोजी शीरी हिचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर १४ एप्रिल रोजी तिच्या मृतदेहाचं दफन करण्यात आलं.

मुलीच्या मृत्यूची माहिती समजल्यावर आई-वडील घरी आले तेव्हा त्यांना शीरी हिचा मृतदेह दिसला नाही. कारण तोपर्यंत तिच्या मृतदेहाचं दफन करण्यात आलं होतं. यादरम्यान, कुटुंबीयांच्या हाती मृत मुलीचा मोबाईल लागला. मात्र तो बंद होता. त्यांनी तो दुरुस्त करून घेतला. त्यानंतर तो फोन चालू करून पाहिला असता त्यांना फोनमध्ये मुरादामध्ये शिपाई असलेल्या राजकुमार आणि त्याच्या प्रेयसीचा फोटो सापडला. राजकुमारची प्रेयसी ही शीरी हिची मैत्रिण होती. कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर राजकुमार, त्याची प्रेयसी यांच्यासह चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानंतर शीरी हिचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्याचं पोस्टमार्टेम करण्यात आलं. त्यामध्ये शीरी हिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं.

त्यानंतर पोलिसांचं पथक अधिक तपासामध्ये गुंतलं. तसेच त्यासाठी सर्व्हिलान्सची मदतही घेण्यात आली. तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. तसेच पोलीस आतापर्यंत आरोपी समजत होते तो शिपाई राजकुमार निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. तर शीरी हिची हत्या गावातीलच मोहम्मद साहिम यानं केल्यांच उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद साहिम आणि शीरी यांचे प्रेमसंबंध होते. १२ एप्रिल रोजी शीरी हिने त्याला भेटायला बोलावले होते. त्यावेळी तो वेळेआधीच तिथे पोहोचला. मात्र तिथे जाताच त्याला जे दिसले ते पाहून त्याला धक्काच बसला. मग साहिम आणि शीरी यांच्यात वाद झाला आणि संतापलेल्या साहिमने शीरी हिची गळा आवळून हत्या केली.

दरम्यान, शीरी हिच्या मोबाईलमधील कॉल डिटेल तपासण्यात आली. तेव्हा मृत शीरी आणि आरोपीमधील संबंध उघडकीस आले. पोलिसांनी मागच्या मंगळवारी या खटल्याचा उलगडा करताना आरोपी मोहम्मद साहिम याची तुरुंगात रवानगी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश