शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'फेस रिकग्निशन' कॅमेऱ्यांची कमाल! उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जेरबंद

By योगेश पांडे | Updated: February 20, 2025 00:48 IST

एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने मोजला जातो भाविकांचा आकडा

योगेश पांडे, प्रयागराज: ५२ कोटींहून अधिक भाविकांनी आतापर्यंत भेट दिलेल्या महाकुंभात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. विशेषत: चेंगराचेंगरीनंतर ‘एआय’ तसेच फेस रिकग्निशन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर जास्त पाळत ठेवण्यात येत आहे. याच ‘एफआरएस’ कॅमेऱ्यांच्या मदतीने गेल्या महिन्याभरात प्रयागराजपोलिसांनी कुंभमेळ्यातून २५ हून कुख्यात तसेच वॉन्टेंड गुंडांना ताब्यात घेतले आहे.

एकाच ठिकाणावरून गर्दीवर वॉच ठेवण्यासाठी इन्टिग्रेटेड कमांड ॲंड कंट्रोल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. प्रयागराज शहर व संगमाजवळ मिळून २ हजार ७०० कॅमेरे लावण्यात आले आहेत. यात शेकडो फेस रिकग्निशन कॅमेऱ्यांचादेखील समावेश आहे. या कॅमेऱ्यांशी निगडीत सॉफ्टवेअरमध्ये पोलिसांनी उत्तरप्रदेशमधील वॉंटेड गुन्हेगारांचे फोटोच अगोदरच अपलोड करून ठेवले होते. त्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २५ हून अधिक गुन्हेगारांना पकडण्यात यश आले आहे.

पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने हे आकडे अधिकृत केलेले नाहीत. मात्र एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. याच कॅमेऱ्यांच्या मदतीने हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचेदेखील प्रयत्न करण्यात येतात. मात्र बहुतांश जनता पायी चालत असून अनेकांचे फोटो व माहिती कुठल्याही डेटाबेसला नाही. त्यामुळे या फेस रिकग्निश कॅमेऱ्यांचा वापर प्रामुख्याने असामाजिक तत्व व कुख्यात गुंडांचा शोध घेण्यासाठीच करण्यात येत आहे.

एकाच सेंटरवरून ‘क्राऊड मॅनेजमेन्ट’

‘लोकमत’ने संबंधित इन्टिग्रेटेड कमांड ॲंड कंट्रोल सेंटरला भेट दिली असता तेथे पोलिसांची मोठी चमू विविध कॅमेऱ्यांच्या माध्यमांतून घाट तसेच शहरातील गर्दीवर लक्ष ठेवताना दिसून आली. या सेंटरमध्ये विविध विभागांशी संबंधित अधिकारीदेखील २४ बाय ७ उपस्थि त असतात. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवत आवश्यक त्या वेळी वाहतूक वळविण्याचे निर्देश येथूनच देण्यात येतात, अशी माहिती येथील इन्चार्ज व आयपीएस अधिकारी अमित कुमार यांनी दिली.

एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने मोजला जातो भाविकांचा आकडा

महाकुंभ प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत प्रयागराजला ५६ कोटींहून अधिक भाविकांना भेट दिली आहे. ही आकडेवारी कुठून आली याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही आकडेवारी एकत्रित करण्यात येत आहे. विविध ठिकाणी लागलेल्या या कॅमेऱ्यांचा सॅम्पलिंग डेटा सॉफ्टवेअरमध्ये टाकून अल्गोरिदम व विशिष्ट सांख्यिकी फॉर्म्युल्याच्या आधारावर ही आकडेवारी जारी करण्यात येत आहे. यासाठी महाकुंभ प्रशासनाकडून एका मल्टिनॅशनल कंपनीचे सहकार्य घेण्यात येत आहे.

 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकPrayagrajप्रयागराज