शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत पतीनं घरात चिकन आणलं; दुखावलेल्या पत्नीनं आयुष्य संपवलं; शेवट भयंकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:51 IST

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील वंशीवाला गावात धक्कादायक घटना घडली.

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील वंशीवाला गावात धक्कादायक घटना घडली. पतीने दारुच्या नशेत घरात चिकन आणले म्हणून दुखावलेल्या एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. घटना लपवण्यासाठी पतीने तिचा मृतदेह जवळच्या नदीत फेकून दिला आणि ती बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दिली. परंतु, मृत महिलेच्या नातेवाईकांना पतीच्या भूमिकेबद्दल संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला असून मृत महिलेच्या पतीसह त्याच्या दोन भावांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  रीना सिंग (वय, २१) असे मृत महिलेचे नाव आहे. आदमपूरमधील कोकापूर गावातील रहिवासी असलेल्या रीनाने दहा महिन्यांपूर्वी निगम सिंगशी लग्न केले. रीना शाकाहारी होती. मात्र, असे असतानाही निगम हा दारूच्या नशेत घरी चिकन घेऊन आला. त्यामुळे दुखावलेल्या रीनाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटना लपवण्यासाठी निगम सिंगने त्याचा भाऊ महकर आणि चुलत भाऊ बिजेंद्र सिंग यांच्या मदतीने रीनाचा मृतदेह एका कपड्यात गुंडाळून घरापासून सुमारे ३ किमी अंतरावर नदीत फेकून दिला. त्यानंतर त्याने स्थानिक पोलीस ठाण्यात रीना बेपत्ता झाल्याची माहिती दिली.

रीना बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून निगमच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला. तसेच रीनाच्या सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी निगमला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबूल केले की, रीनाचा आक्षेप असतानाही तो चिकन घेऊन घरी आला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात रीनाने गळफास लावून आत्महत्या केली. रीनाच्या मृत्युचे खापर आपल्या डोक्यावर फोडले जाऊ नये, म्हणून त्याने मृतदेह नदीत फेकून दिल्याचे सांगितले. याप्रकरणी निगमसह त्याच्या दोन्ही भावांना अटक करण्यात आली. तसेच आत्महत्येसाठी रीनाने वापरलेली ओढणी देखील जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश