"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:02 IST2025-07-18T16:01:37+5:302025-07-18T16:02:25+5:30
"आपल्या पुढी आव्हान असे आहे की, काही लोक समाजातील लोकांना मुख्यप्रवाहापासून वेगळे करण्याचे काम करत आहेत. काही लोक सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जातीय संघर्षाची स्थिती निर्माण करतात."

"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. जौनपूर येथे मोहरम दरम्यान ऊंच 'ताजियां'मुळे झालेल्या दुर्घटनेनंतर, लोकांच्या विरोधाचा उल्लेख करत, मुख्यमंत्री योगी म्हणाले, "मी पोलिसांना म्हणालो, यांना लाठ्या मारून बाहेर काढा. कारण, 'ये लातों के भूत हैं, बातों से नहीं मानेंगे'". एवढेच नाही तर, "मोहरमच्या प्रत्येक मिरवणुकीमुळे, दंगली, जाळपोळ आणि तोडफोड होत असे. दुसऱ्या बाजूला कावड यात्रा सुरू आहे, जो एकतेचा अद्भुत संगम आहे," असेही योगी म्हणाले. ते शुक्रवारी वाराणसी येथे बोलत होते.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, "श्रावण महिना सुरू आहे. त्यापूर्वी मोहरम होता. आम्ही नियम तयार केला होता की, ताजीयाची उंची मर्यादित ठेवण्यात यावी. कारण यामुळे वीजेच्या तारा आणि झाडांच्या फांद्यांचे नुकसान होते. जौनपूरमध्ये एक घटना घडली, ताजिया एवढा उंच होता की, तो हायटेन्शन लाईनच्या संपर्कात आला आणि या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला. यानंतर, गोंधळ निर्माण झाला आणि रस्ता जाम करण्यात आला. पोलिसांनी मला विचारले, यावर मी म्हणालो, काठ्या चालवा. 'ये लातों के भूत हैं. बातों से नही मानेंगे.' सोशल मीडियावर कोणीही याचा विरोध केला नाही."
योगी पुढे म्हणाले, "आपल्या पुढी आव्हान असे आहे की, काही लोक समाजातील लोकांना मुख्यप्रवाहापासून वेगळे करण्याचे काम करत आहेत. काही लोक सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जातीय संघर्षाची स्थिती निर्माण करतात."
"2,3 वर्षांपूर्वी, अशीच एक घटना घडली होती, एका जाळपोळीच्या घटनेत एका व्यक्तीने भगवे अंगावर घेतलेले होते. पण मध्येच त्याच्या तोंडून 'या अल्लाह' असे निघाले. असे लोक ओळखणे आवश्यक आहे," असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.