शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 11:49 IST

Online Nikah: उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात सध्या एका अजब लग्नाची गजब गोष्ट चर्चेत आहे. येथील एका भाजपा नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी तरुणीसोबत ऑनलाइन निकाह केला आहे.

उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात सध्या एका अजब लग्नाची गजब गोष्ट चर्चेत आहे. येथील एका भाजपा नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी तरुणीसोबत ऑनलाइन निकाह केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जौनपूरमधील भाजपा नगरसेवक तहसीन शाहीद यांनी त्यांच्या मुलाचा निकाह लाहोरमध्ये करण्याचे ठरवले होते. मात्र त्यांना व्हिसा मिळू शकला नाही. त्यामुळे या वधू-वरांचा ऑनलाइन निकाह लावून देण्यात आला.

जौनपूर येथील भाजपाचे नगरसेवक तहसीन शाहीद यांनी त्यांचा मोठा मुलगा मोहम्मद अब्बास हैदर याचा निकाह पाकिस्तानमधील लाहोर येथील अंदलीप जहरा हिच्यासोबत ठरवला होता. नियोजनानुसार हा निकाह पाकिस्तानमध्ये होणार होता. त्यासाठी त्यांनी व्हिसा मिळावा म्हणून अर्जदेखील केला होता. मात्र दोन्ही देशांमध्ये असलेल्या राजकीय तणावामुळे वराला व्हिसा मिळू शकला नाही.

यादरम्यान, वधूची आई राणा यास्मिन झैदी ही आजारी पडली. तिला रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. ही परिस्थिती पाहून हा निकाल ऑनलाइन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शुक्रवारी रात्री वर हैदर याच्यासह वरपक्षाकडील मंडळी एका इमामवाड्यात एकत्र जमले आणि  ऑनलाइन निकाहामध्ये सहभागी झाले. तर वधूच्या कुटुंबीयांनी लाहोरमधून या विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. शिया धार्मिक नेते मौलाना महफुजूल हसन यांनी सांगितले की, इस्लाममध्ये निकाहसाठी महिलेची मान्यता आवश्यक असते, त्याबाबत ती मौलानांना सांगते. जेव्हा दोन्ही बाजूचे मौलाना एकाचवेळी समारंभ आयोजित करतात, तेव्हाच ऑनलाइन निकाह तेव्हाच शक्य आहे. हैदर याने सांगितले की, माझ्या पत्नीला कुठल्याही अडचणीशिवाय भारताचा व्हिसा मिळेल, अशी अपेक्षा आहे. या निकाहात आमदार ब्रिजेश सिंह प्रिशू आणि इतर नेते सहभागी झाले होते.  

टॅग्स :marriageलग्नIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशPakistanपाकिस्तान