शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदाराला मोठा दिलासा, कोर्टाने 2 वर्षांच्या शिक्षेला दिली स्थगिती, आता खासदारकी रद्द होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 21:00 IST

टोरेंट पॉवर हल्ला आणि तोडफोड प्रकरणात रामशंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा सुनावल्यानंतर रामशंकर कठेरिया यांची खासदारकी धोक्यात आली होती.

उत्तर प्रदेशातील इटावा येथील भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एमपी-एमएलए कोर्टाने दोन दिवसांपूर्वी सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सोमवारी जिल्हा न्यायाधीशांनी स्थगिती दिली. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी कोर्टाने ११ सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. टोरेंट पॉवर हल्ला आणि तोडफोड प्रकरणात रामशंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा सुनावल्यानंतर रामशंकर कठेरिया यांची खासदारकी धोक्यात आली होती.

सोमवारी कोर्ट सुरू होताच खासदार रामशंकर कठेरिया आपल्या वकिलांसह कोर्टात पोहोचले, त्यांनी विशेष एमपी-एमएलए कोर्टाच्या निर्णयाला जिल्हा न्यायाधीश कोर्टात आव्हान देऊन तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. रामशंकर कठेरिया यांचे अपील ग्राह्य धरून कार्टाने दुपारी दोन वाजता सुनावणी घेत शिक्षेला स्थगिती देत ​​पुढील सुनावणीसाठी ११ सप्टेंबरची तारीख दिली. कोर्टाच्या निर्णयानंतर रामशंकर कठेरिया म्हणाले की, २०११ मध्ये आपल्यावर दाखल करण्यात आलेला खटला राजकीय होता, न्याय मिळाला आहे, आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. 

साकेत मॉलमधील टोरेंट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करून गोंधळ घातल्याचा आरोप भाजप रामशंकर कठेरिया यांच्यावर करण्यात आला होता.  ही घटना १६ नोव्हेंबर २०११ रोजी घडली होती. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी एमपी-एमएलए कोर्टाने रामशंकर कठेरिया यांना कलम १४७ आणि ३२३ अंतर्गत दोषी ठरवले होते. तसेच, या प्रकरणी न्यायालयाने राम शंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यासोबतच ५० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता. त्यामुळे रामशंकर कठेरिया यांची खासदारकी धोक्यात आली होती.

काय आहे कायदा?दरम्यान, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार खासदार किंवा आमदाराला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्यांचे संसद आणि विधानसभेचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. यासोबतच दोन वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात येत असून या काळात त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही.

टॅग्स :Member of parliamentखासदारBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालय