अयोध्येतील रामलला मंदिरासह आता संपूर्ण श्री रामजन्मभूमी परिसरच हळूहळू पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून फाइनल टच दिला जात आहे. ५०० वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर अयोध्येत प्रभू रामचंद्रजींचे मंदिर उभे राहिले आहेत. दिवाळीपूर्वीच, राम मंदिर ट्रस्ट अयोध्येत येणाऱ्या राम भक्तांना एक मोठी भेट देणार आहे. १५ ऑक्टोबरपासून भाविक, राम मंदिर परकोटेच्या शेषावतारासह सर्व ६ मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजा करू शकतील. एवढेच नाही तर, राम मंदिराचा दुसरा मजलाही पूर्णपणे तयार आहे, तेथे केवळ दरवाजा बसवण्याचेचे काम शिल्लक आहे.
या दिवाळीपूर्वीच, राम भक्त राम मंदिरात बाल राम तसेच राजा रामाचेही दर्शन करू शकतील. यासंदर्भात ट्रस्टमध्येही विचार विनिमय सुरू झाला आहे. याशिवाय, परकोटेच्या सर्व मठ मंदिरांमध्ये राम भक्त कशा पद्धतीने दर्शन घेऊ शकतील आणि पूजा करू शकतील, यासंदर्भात सुरक्षा एजन्सी आणि राम मंदिर ट्रस्ट यांच्यात बैठकाही सुरू झाल्या आहेत. श्रीराम मंदिराशिवाय इतरही मंदिरांमध्ये दर्शन करण्यास राम भक्त उत्सुक आहेत. राम भक्तांचे म्हणणे आहे की, आता आपल्या परमेश्वराचे मंदिर बांधून तयार झाले आहे. शेकडो वर्षांचा संघर्ष संपला आहे. फाच चांगले वाटत आहे.
रस्त्यांची कामेही सुरू - यासंदर्भात बोलताना राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले, राम मंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मंदिराला फाइनल टच दिला जात आहे. 15 ऑक्टोबरपासून राम भक्त प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासोबतच इतर मंदिरांतही दर्शन घेऊ शकतील आणि पूजन करू शकतील. या मठ-मंदिरांमध्ये जाण्यासाठी रस्तेही तयार केले जात आहेत. तसेच, भाविकांना सहज आणि उत्साहाने प्रभूंचे दर्शन करता यावे, अशी योजना ट्रस्ट तयार करत आहे.