राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची 'गेस्ट लिस्ट' आली! ८ हजार पाहुण्यांमध्ये 'यांचा' समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 09:34 IST2024-01-20T09:33:01+5:302024-01-20T09:34:36+5:30

अमिताभ बच्चन, मुकेश-नीता अंबानी असणार 'राजकीय अतिथी'; आणखीही बरीच नावे राहणार उपस्थित

Ayodhya ram mandir pranpratishtha guest list mukesh ambani amitabh bachchan virat kohli see all | राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची 'गेस्ट लिस्ट' आली! ८ हजार पाहुण्यांमध्ये 'यांचा' समावेश

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची 'गेस्ट लिस्ट' आली! ८ हजार पाहुण्यांमध्ये 'यांचा' समावेश

Ram Mandir Ayodhya Guest List: अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार असलेल्या पाहुण्यांची यादी (गेस्ट लिस्ट) समोर आली आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या सुमारे ८ हजार लोकांच्या यादीत राजकीय पाहुण्यांच्या नावांचाही समावेश आहे. यासोबतच प्रमुख राजकीय नेते, उद्योगपती, चित्रपट अभिनेते, मुत्सद्दी यांचा समावेश आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे नाव राजकीय अतिथी या विभागाच्या पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

बॉलिवूड-कलाविश्वातील कोण कोण?

राम मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी सर्व सेलिब्रिटींना आमंत्रित केले गेले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्यासाठी खासगी विमानाने अयोध्येला पोहोचणार आहेत. बॉलिवूडमधून अजय देवगण, अक्षय कुमार, अल्लू अर्जुन, मोहनलाल, अनुपम खेर आणि चिरंजीवी यांचीही नावे अयोध्येला पोहोचणाऱ्या स्टार्सच्या यादीत आहेत. याशिवाय दिग्दर्शक संजय भन्साळी आणि चंद्रप्रकाश द्विवेदी, सरोद वादक अमजद अली, गीतकार मनोज मुंतशीर आणि त्यांची पत्नी, गीतकार आणि लेखक प्रसून जोशी यांनाही या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

बड्या उद्योगपतींचा यादीत समावेश

समजलेल्या पाहुण्यांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्यासह त्यांची आई कोकिलाबेन, पत्नी नीता अंबानी, मुले आकाश आणि अनंत तसेच सून श्लोका आणि भावी सून राधिका मर्चंट यांचा समावेश आहे. इतर उद्योगपतींमध्ये आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह त्यांची पत्नी नीरजा, पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल, आनंद महिंद्रा आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) के. कीर्तिवासन यांचा समावेश आहे. इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती, जिंदाल स्टील अँड पॉवरचे प्रमुख नवीन जिंदाल आणि मेदांता ग्रुपचे नरेश त्रेहान, रेड्डीज फार्मास्युटिकल्सचे डॉ. सतीश रेड्डी, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसचे सीईओ पुनित गोयंका आणि लार्सन अँड टुब्रोचे सीईओ एसएन सुब्रमण्यम आणि त्यांच्या पत्नीच्या नावांचाही या यादीत समावेश आहे.

महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजही यादीत!

लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार आणि नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँटेक सिंग अहलुवालिया यांच्या नावांचाही समावेश आहे. भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत, माजी अटर्नी जनरल के. वेणुगोपाल आणि मुकुल रोहतगी, माजी मुत्सद्दी अमर सिन्हा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांच्या नावांचाही या यादीत समावेश आहे. यादीत असे म्हटले आहे की काही पाहुणे त्यांच्या खाजगी विमानाने २२ जानेवारीला अयोध्येत पोहोचतील तर काही नियमित विमानाने एक दिवस आधी पोहोचतील आणि अयोध्या, लखनौसारख्या जवळच्या शहरांमध्ये मुक्काम करतील आणि कार्यक्रमाच्या दिवशी अयोध्येला पोहोचतील.

Web Title: Ayodhya ram mandir pranpratishtha guest list mukesh ambani amitabh bachchan virat kohli see all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.