शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 14:24 IST

Ayodhya Ram Mandir News: या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश-विदेशातील धर्मगुरुंना निमंत्रण पाठवले जाणार आहे.

अयोध्या: देशातील करोडो रामभक्त ज्या क्षणाची वाट पाहत आहेत, तो क्षण त्यांना लवकरच अनुभवायला मिळणार आहे. अयोध्येतील भव्य-दिव्य राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. सोहळ्याला ऐतिहासिक बनवण्यासाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे. 

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश-विदेशातील संत, धर्माचार्य आणि पाहुण्यांना मोठ्या संख्येने आमंत्रित केले जाणार आहे. एकीकडे मठ, मंदिरांमध्ये संत आणि धर्मगुरुंच्या निवासाची व्यवस्था केली जात आहे, तर दुसरीकडे इतर पाहुण्यांच्या निवासासाठी प्रयागराजमधील कुंभाच्या धर्तीवर अयोध्येत हायटेक सुविधांनी सुसज्ज टेंट सिटी उभारण्याची तयारी सुरू आहे. 

राम मंदिराची किती तयारी झाली?अयोध्येतील राममंदिराचा तळमजला आणि गर्भगृह तयार झाले आहे. 20 ते 25 जानेवारी, या कालावधीत धार्मिक विधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देश-विदेशातील धर्मगुरुंना निमंत्रण पाठवले जाणार आहे. रामललाचा अभिषेक सोहळा सुमारे नऊ दिवस चालेल, ज्यामध्ये धर्माचार्य धर्मग्रंथानुसार धार्मिक विधी पार पाडतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका शुभ मुहूर्तावर रामललाला गर्भगृहात विराजमान करतील. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लाखो लोक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व तयारी सुरू आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशTempleमंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी