शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोळी नाही तर हार घालायचा का? प्रतिष्ठा मठातही मिळाली असती, मी येथे...; अयोध्या बलात्कार प्रकरणावरून CM योगी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 18:11 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणावरून समाजवादी पक्षावर भरविधानसभेत हल्ला चढवला.

अयोध्येतील बलात्कार प्रकरण आता अधिकाधिक भडकताना दिसत आहे. यामुळे समाजवादी पक्षाची अडचण होताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणावरून सपावर थेट निशाणा साधला आहे. योगी म्हणाले, अयोध्येतील अल्पवयीन मुलीवर बालात्कार केल्याचा आरोप असलेली व्यक्ती सपा खासदारासोबत उठते-बसते आणि पक्ष तिच्यावर कसलीही कारवाई करत नाही. एवढेच नाही तर, मी येथे प्रतिष्ठेसाठी आलेलो नाही. ती मला अपल्या मठातही मिळाली असती. मी येथे यासाठी आलो आहे की, जर त्यांनी (अपराधी) केले, तर भोगावे लागेल.

अशा गुन्हेगारांन गोळी घालायची नाही तर... -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणावरून समाजवादी पक्षावर भरविधानसभेत हल्ला चढवला. योगी म्हणाले, "अयोध्येत 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे समाजवादी पक्षाशी संबंध आहेत. आरोपी सपा खासदाराच्या जवळचा आहे. आरोपीने मागास समाजातील मुलीवर बलात्कार केला आणि तो समाजवादी पक्षाच्या खासदारासोबत फिरत होता. समाजवादी पक्षाने त्या आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही." एवढेच नाही तर, "अशा गुन्हेगारांना गोळी घालायची नाही, तर काय हार घालायचा का?" असा सवालही योगी आदित्यनाथ यांनी केला.

सपा नेत्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप -समाजवादी पक्षाचा नेता मोईन खानवर 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले. यानंतर कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची पुष्टी केली. यानंतर पीडितेने आई-वडिलांना संपूर्ण प्रकरण सांगितले. अल्पवयीन मुलगी ही निषाद कुटुंबातील आहे. आरोपी सपा नेता एका बेकरीचा मालक आहे. बेकरीमध्ये नोकरीचे अमिष दाखवत त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

व्हिडिओ तयार करून... -आरोपीने पीडितेवरील बलात्काराचा व्हिडिओ तयार करून तिला, कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तो तिच्यावर दोन महिने बलात्कार करत होता. ही घटना अयोध्येतील पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक समाजवादी पक्षाचा भदरसा नगराध्यक्ष आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAyodhyaअयोध्याSexual abuseलैंगिक शोषणSamajwadi Partyसमाजवादी पार्टी