शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच लोकांकडून झाला दगाफटका? भाजपनं प्रत्येक जिल्ह्यातून मागवला अहवाल, आता थेट अ‍ॅक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 14:01 IST

या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 75 जागांवर निवडणूक लढवली होती. यांपैकी केवळ 33 जागांवरच भाजपचा विजय झाला आहे. २०२९ मध्ये भाजपने एकूम ६२ जागा जिंकल्या होत्या.

लखनौ - लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे विजय न मिळाल्याने आता भाजप अॅक्शन मोडवर आला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये बूथवार झालेल्या दगाफटक्यासंदर्भात आणि मतदानासंदर्भातील अहवाल प्रदेश मुख्यालयाने मागवला आहे. हा अहवाल सर्व पराभूत झालेल्या उमेदवारांनी आणि विजयी झालेल्या खासदारांनी पाठवला आहे. या अहवालात जिलाध्यक्षांपासून ते आमदार, एमएलसी आणि बूथ पर्यंतच्या अध्यक्षांची तक्रार करण्यात आली आहे. 

प्रत्येक बुथचा अहवाल मागवला - या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 75 जागांवर निवडणूक लढवली होती. यांपैकी केवळ 33 जागांवरच भाजपचा विजय झाला आहे. २०२९ मध्ये भाजपने एकूम ६२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी या जागा थेट अर्ध्यावर आल्या आहेत. यातच, स्थानिक पातळीवर संघटनेने आपल्याला मदत केली नही, असा आरोप  केंद्र सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या साध्वी निरंजन ज्योती यांनी केला आहे. तसेच, पक्षातील अतर्गत दगाफटक्यामुळे पराभव झाल्याचा आरोप गाझियाबादच्या लोनीतील भाजप आमदार नंद किशोर गुर्जर यांनी केला आहे. काही लोकांनी दगाफटका केला आहे. संपूर्ण प्लॅनिंगने भाजपला पराभूत करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्लॅनिंगमध्ये काही अधिकाऱ्यांनीही मदत केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

भाजपने मागवलेल्या या अहवालाच्या आधारे लवकरच दहाहून अधिक जिल्ह्यांत, महानगर अध्यक्ष आणि प्रदेशातील टीममध्ये काही बदल केला जाऊ शकतो.

मुख्यमंत्री-उप मुख्यमंत्रीही जाणार दिल्लीत -भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री  केशव प्रसाद मौर्य, बृजेश पाठक आणि सर्व विजयी झालेल्या खासदारांनाही दिल्लीत बोलावले आहे. मुख्यमंत्री योगी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता दिल्लीत पोहोचतील. शुक्रवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी यांना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडले जाईल. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर उत्तर प्रदेशसंदर्भात चर्चा होऊ शकते. भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, सीएम योगी, उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन उत्तर प्रदेशच्या जागांवर विचारमंथन करू शकतात. याची संपूर्ण तयारीही करण्यात आली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालyogi adityanathयोगी आदित्यनाथ