शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती परीक्षेत सनीचं प्रवेशपत्र; गुन्हे शाखेनं तरूणाला पकडलं, त्यानं मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 11:55 IST

उत्तर प्रदेशातील कन्नोज जिल्ह्यात पोलीस भरती परिक्षेदरम्यान अनोखी घटना समोर आली.

कन्नोज: उत्तर प्रदेशातील कन्नोज जिल्ह्यात पोलीस भरती परिक्षेदरम्यान एक अनोखी घटना समोर आली. येथील सोनश्री मेमोरियल कॉलेजमध्ये पोलीस भरती परीक्षेत अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने प्रवेशपत्र सापडले. प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखा आणि एसओजी पथकाने संबंधित विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्याची चौकशी केली.

महोबा येथील उमेदवाराचे हे प्रवेशपत्र असल्याचे निष्पन्न झाले. धर्मेंद्र सिंह याच्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा फोटो पाहून तरूणालाही धक्का बसला. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला सर्व कागदपत्रांसह चौकशीसाठी बोलावले. त्याने अर्जात सर्व अचूक माहिती आणि फोटो अपलोड केल्याचा विद्यार्थ्याचा दावा आहे. पण प्रवेशपत्र काढले असता त्यात अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो आढळून आला, त्यामुळे तो भरती परीक्षेपासून वंचित राहिला. 

सनी लिओनीचे प्रवेशपत्र अधिकाऱ्यांनी ही बाब राज्य भरती आणि पदोन्नती मंडळाला कळवली. अर्ज केलेल्या व्यक्तीची चौकशी करणाऱ्या पोलिसांना संबंधित उमेदवार महोबा येथे असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर एसओजी पथकाने त्याला चौकशीसाठी बोलावले. धर्मेंद्र या तरूणाने सांगितले की, परीक्षेसाठी अर्जाची नोंदणी करताना त्याने सर्व माहिती व फोटो अचूक अपलोड केला होता. प्रिंट आऊट काढल्यावर नाव आणि फोटो सगळे बरोबर होते. मात्र, परीक्षेच्या एक दिवस आधी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आले तेव्हा त्यावर अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो होता.

धर्मेंद्रची पोलिसांकडून चौकशी धर्मेंद्र दोन वर्षे प्रयागराज जिल्ह्यात राहून पोलीस भरतीची तयारी करत आहे. महोबा येथे त्याने ४ जानेवारी रोजी एका खासगी कॅफेमधून भरतीसाठी अर्ज केला. १७ फेब्रुवारीला तो कन्नौज येथील केंद्रावर परिक्षेसाठी गेला होता, मात्र प्रवेशपत्रात बदल झाल्यामुळे तो परीक्षेला बसू शकला नाही. पोलिसांनी सांगितले की, महोबाच्या सायबर कॅफेमधून पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला होता. ॲडमिट कार्डमध्ये सनी लिओनीचा फोटो दिसत आहे. त्यामुळे एसओजी पथकाने त्याला चौकशीसाठी बोलावले आहे.

टॅग्स :Sunny Leoneसनी लिओनीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस