शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीची 'इंग्रजी' अन् महिला अधिकाऱ्याची मुजोरी; मुलीनं आव्हान देताच लगावली कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 14:13 IST

उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे.

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. मुलीने प्रशासकीय अधिकाऱ्याला इंग्रजीत उत्तर दिल्याने संबंधित अधिकाऱ्याचा पारा चढला. सार्वजनिकरित्या १२वीची विद्यार्थिनी आपल्याला आव्हान देत असल्याचे जाणवताच महिला अधिकाऱ्याने मुलीच्या कानशिलात लगावली. महिला अधिकारी इतकी भडकली की तिने सर्वांसमोरच विद्यार्थिनीला चापट मारली. महिला अधिकाऱ्याच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीला थप्पड मारल्यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला. मग पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील असल्याचे कळते.

वाराणसीतील भीशामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमिनीचा वाद चिघळला असून या वादाचा निकाल उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने एका पक्षाच्या जमिनीचा काही भाग ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे परिसरातील तहसीलदार प्राची केसरबानी या पोलीस फौजफाटा घेऊन जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसांचा फौजफाटा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

अधिकाऱ्याच्या मुजोरीचा व्हिडीओ व्हायरल दरम्यान, जमलेल्या नागरिकांनी पोलीस आणि महिला अधिकाऱ्याला विरोध केला. "तुम्ही कोणत्या आदेशाच्या आधारे अतिक्रमणाची कारवाई करत आहात", असा प्रश्न नागरिकांनी केला असता महिला अधिकाऱ्याने आदेश इंग्रजीत असल्याचे सांगून नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच इंग्रजीत आलेला आदेश तुम्ही वाचू शकता का? असे देखील अधिकाऱ्याने सांगितले. तेवढ्यात विरोध करणाऱ्या लोकांमध्ये असलेली एक बारावीची विद्यार्थिनीनी पुढे आली. विद्यार्थिनीने इंग्रजीत उत्तर दिल्यावर महिला अधिकारी संतापली अन् तिने विद्यार्थिनीच्या कानशिलात लगावली. 

प्रशासकीय अधिकाऱ्याचा संताप कॅमेऱ्यात कैद विद्यार्थिनीने सर्वांसमोर आपल्याला आव्हान दिल्याने संबंधित प्रशासकीय अधिकारी संतापली. घटनास्थळी उभ्या असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलenglishइंग्रजी