शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कार अन् बाईकचा भीषण अपघात, चिमुकल्यासह ३ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 16:54 IST

मोतीगंज ठाणे क्षेत्रातील कोल्हुआ बनकटा गावचा रहिवाशी असलेला नीरज रविवारी सकाळी औषधे आणण्यासाठी बाईकवरुन जात होता.

लखनौ - उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात धानेपूर परिक्षेत्रात बुधवारी सकाळी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर दोघांना रुग्णालयात नेत असताना त्यांनी जीव सोडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून कार व बाईक जप्त करण्यात आली आहे.

मोतीगंज ठाणे क्षेत्रातील कोल्हुआ बनकटा गावचा रहिवाशी असलेला नीरज रविवारी सकाळी औषधे आणण्यासाठी बाईकवरुन जात होता. नीरजमसवेत मुजेहना गावातील रहिवाशी असलेले त्याचे काका (४५) व त्यांचा नातू अक्षय उर्फ गुड्डू (९) हेही बाईकवर बसलेले होते. गोंडा-उतरौला मार्गावर सोहिला झीलजवळ हे तिघे पोहोचले असता समोरुन वेगात येणाऱ्या कारने त्याच्या बाईकला जोराची धडक दिली. या अपघातात बाईकवरील तिघेही उडून दूरवर पडले. 

या दुर्घनटेत बाईकवरील लहान मुलगा अक्षय उर्फ गुड्डूचा जागीच मृत्यू झाला. तर, नीरज आणि मिश्रिलाल गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी, नीरज आणि मिश्रिलाल यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यामुळे, त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राथमिक माहितीच्या आधारे पोलीस डायरीत नोंद करण्यात आली आहे.  

टॅग्स :Accidentअपघातcarकारgonda-pcगोंडाUttar Pradeshउत्तर प्रदेश