शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत चेंगराचेंगरी घडवण्याचा कट...; आकाशातून येणारं संकट क्षणात हाणून पाडलं! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:00 IST

राम मंदिर परिसरात ड्रोन उडवल्याबद्दल एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी गेट क्रमांक ३ वर ही घटना घडली.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात सध्या प्रचंड गर्दी दिसत आहे. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणेरे भाविक मोठ्या संख्येने अयोध्येतही जात आहेत. दरम्यान सोमवारी सायंकाळच्या सुमारास एक मोठा कट हाणून पाडण्यात आला आहे. मंदिरात रामललाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत एक ड्रोन अचानक पडले. हे हवाई संकट पाहून लोक गडबडले.  मात्र, तेथे तैनात असलेल्या अँटी ड्रोन सिस्टिमने ते तत्काळ हाणून पाडले. यानंतर, सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण एजन्सीज सतर्क झाल्या आहेत.

गेट क्रमांक ३ वर घडली घटना -राम मंदिर परिसरात ड्रोन उडवल्याबद्दल एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी गेट क्रमांक ३ वर ही घटना घडली. राम मंदिर परिसरात भाविकांच्या प्रचंड गर्दीत अचानक एक ड्रोन पडले. यानंतर, अँटी ड्रोन सिस्टिमच्या ट्रायलला वेग आला आहे.

राम मंदिराच्या आवारात ड्रोन पडल्याने उडाली खळबळ -  राम मंदिराच्या आवारात ड्रोन पडल्याने खळबळ उडाली आहे. देशात महाकुंभ सुरू असताना आणि मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असताना ही घटना घडली. पोलिसांनी तत्काळ ड्रोन ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. राम मंदिर परिसर ड्रोन पडल्याच्या घटनेच्या तपासात, हा कट असल्याचे बोलले जात आहे. 

ड्रोनच्या मदतीने कृत्याचा छडा लावण्याचा प्रयत्न -गर्दीमध्ये चेंगराचेंगरी निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले गेले असावे, असे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी अज्ञात तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि ते ड्रोनच्या मदतीने कृत्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर