जीव वाचवण्यासाठी पळाले वऱ्हाडी मंडळी जेव्हा लग्नात ‘जेवायला’ आला बिबट्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 05:35 IST2025-02-14T05:30:19+5:302025-02-14T05:35:01+5:30
बिबट्याने एका पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याने वऱ्हाडी मंडळींवर हल्ला केला नाही.

जीव वाचवण्यासाठी पळाले वऱ्हाडी मंडळी जेव्हा लग्नात ‘जेवायला’ आला बिबट्या अन्...
लखनऊ : येथे विवाहस्थळी एक अगांतुक पाहुणा म्हणजे बिबट्याचे आगमन झाल्याने प्रचंड घबराट निर्माण झाली. त्याला पाहून वऱ्हाडी मंडळी जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत सुटली. वधू-वरांनीही मंडपातून धूम ठोकली व एका कारमध्ये दडून बसले. बिबट्याच्या भीतीने ते काही तास बाहेरच आले नाहीत.
हा अजब प्रकार बुधेश्वर रोड परिसरातील बँक्वेट हॉलमध्ये बुधवारी घडला. माहिती मिळताच बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात वन अधिकारी जखमी झाले आहेत. बिबट्याने एका पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याने वऱ्हाडी मंडळींवर हल्ला केला नाही.
वनक्षेत्रात अतिक्रमण वाढले : अखिलेश
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, वनक्षेत्रात अतिक्रमण वाढल्याने वन्यप्राणी मानवी वस्त्यांमध्ये येत आहेत. भाजपच्या राज्य सरकारच्या भ्रष्टाचारामुळे वनक्षेत्रात अतिक्रमण वाढत आहे. वन्यप्राणी माणसांवर हल्ले करण्याचाही धोका आहे. या गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकार प्रभावी उपाययोजना करेल का, असा खोचक सवालही अखिलेश यादव यांनी विचारला.