शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:47 IST

एका तरुणाने प्रेयसीसाठी जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना केली जाऊ शकत नाही असे बोलले जाते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली. इथे एका तरुणाने प्रेयसीसाठी जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. आपल्या प्रेयसीला नवनवीन भेटवस्तू देण्यासाठी तो चोरी करत असे. यातून मिळालेल्या पैशांतून तो प्रेयसीला तिच्या आवडीच्या वस्तू भेट म्हणून द्यायचा. विशेष बाब म्हणजे केवळ प्रेयसीचा खर्च भागवण्यासाठी त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौ येथील गोमती नगर परिसरात राहणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांना त्याची माहिती मिळाली. तो मूळचा जौनपूर येथील रहिवासी असून, अब्दुल हलीम असे त्याचे नाव आहे. तो गोमती येथे वास्तव्यास असून, कायद्याचे शिक्षण घेत आहे. चोरी करताना तो सापडताच त्याने प्रेयसीसाठी चोरी करत असल्याचे पोलिसांना सांगितले.

आरोपीवर अटकेची कारवाई आरोपी अब्दुलने एकाच दिवशी तीन घरांमध्ये चोरी केली होती. प्रेयसीला मॉलमध्ये फिरायची आवड आहे, नवीन वस्तूंची शॉपिंग करणे, आयफोन खरेदी करणे आणि क्लबमध्ये जाण्यासाठी पैशांची गरज भासायची. प्रेयसीसोबत चित्रपट पाहायला जातावेळी पैशांची कमतरता जाणवायची म्हणून हा मार्ग अवलंबवला. प्रेयसीच्या सर्व मागण्या पूर्ण करता याव्या म्हणून चोरी हाच एक पर्याय समोर होता, असे आरोपीने सांगितले. आरोपीकडून काही वस्तू आणि रक्कम जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी साउथ जोन केशव यांनी सांगितले की, आरोपी कायद्याचे शिक्षण घेत आहे. चोरी करतानाचा त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशtheftचोरीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस