शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापूर्वी मोठा निर्णय! आता परिसराची सुरक्षा CRPF नाही, UP SSF सांभाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 20:23 IST

आता सीआरपीएफ राम मंदिराच्या परिसरात सुरक्षा देणार नाही. सीआरपीएफ गेल्या ३५ वर्षांपासून मंदिराची सुरक्षा सांभाळत आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर सुरक्षा समितीची बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. बैठकीनंतर अयोध्या विभागाचे आयुक्त गौरव दयाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. गौरव दयाल यांनी सांगितले की, रामजन्मभूमीची सुरक्षा आता यूपी एसएसएफ म्हणजेच उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा दल हाताळेल. सीआरपीएफच्या जागी यूपी एसएसएफचे जवान तैनात केले जातील. एसएसएफचे जवान अयोध्येत पोहोचले असून त्यांचे एक आठवड्याचे विशेष प्रशिक्षण सुरू आहे. रामजन्मभूमी परिसरात एसएसएफसोबत पीएसी आणि सिव्हिल पोलिस कर्मचारीही तैनात असणार आहेत.

भयावह! गाझियाबादमध्ये बसचा भीषण अपघात; १५-२० प्रवासी जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य

१६ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त गौरव दयाळ यांनी सांगितले. राम मंदिराच्या तळमजल्यावरील फिनिशिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या मजल्यावरील बांधकामाचेही जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. इतर बांधकामे वेगाने सुरू आहेत. आज रामजन्मभूमी मंदिर सुरक्षा समितीची बैठक पार पडली. एडीजी सिक्युरिटी एस प्रताप कुमार, एडीजी झोन ​​पीयूष मोरदिया, सीआरपीएफचे अधिकारी आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी यूपी एसएसएफला कधी मिळणार याबाबत आयुक्त गौरव दयाल यांनी माहिती दिली नाही. ते बोलताना म्हणाले की, आता सीआरपीएफच्या जागी यूपी एसएसएफ तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रामजन्मभूमी सुरक्षा समितीची बैठक दर तीन महिन्यांनी बोलावली जाते. यूपी एसएसएफचे जवान दोन दिवसांपूर्वी अयोध्येत दाखल झाले आहेत.

याआधी रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ तैनात करण्यात आले होते. सीआरपीएफचे जवान सुमारे ३५ वर्षांपासून जन्मभूमीची सुरक्षा सांभाळत आहेत. रामजन्मभूमी सुरक्षा समितीची बैठक संपल्यानंतर अयोध्येचे आयुक्त गौरव दयाल यांचे विधान आले आहे की, सीआरपीएफची जागा घेतल्यानंतर आता जन्मभूमीची सुरक्षा उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा दल म्हणजेच यूपी एसएसएफकडे सोपवली जाईल, त्याबाबत चर्चा होईल. सुरक्षा समितीच्या उच्च अधिकार्‍यांसह बैठक घेतली जाईल.

यूपी एसएसएफचे जवान सात दिवसांचे विशेष प्रशिक्षण घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात राम लल्लाच्या अभिषेक कार्यक्रमापूर्वीच रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. याबाबत सुरक्षेशी संबंधित अधिकारी रामनगरीतच ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी विचारमंथन करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस