'दंड भर नाहीतर घृणास्पद शिक्षा करू'; जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 07:53 PM2021-10-05T19:53:11+5:302021-10-05T20:01:21+5:30

Jat Panchayat in Osmanabad मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पारधी समाजातील काही पुढाऱ्यांनी जात पंचायत भरविली

'pay fine otherwise be ready for disgusting punishment'; Young man commits suicide due to Jat Panchayat harassment | 'दंड भर नाहीतर घृणास्पद शिक्षा करू'; जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

'दंड भर नाहीतर घृणास्पद शिक्षा करू'; जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देपंचांच्या अटकेसाठी मृतदेहासह नातेवाईकांनी मांडला ठिय्या

उस्मानाबाद : मेहुणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जात पंचायतीने ( Jat Panchayat ) २ लाख रुपयांचा दंड करून त्याच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने उस्मानाबादेतील तरुणाने आत्महत्या ( Suicide ) केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, जात पंचायतीच्या पंचांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी ठिय्या दिला होता. ( 'pay fine otherwise be ready for disgusting punishment'; Young man commits suicide due to Jat Panchayat harassment) 

उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील व सध्या उस्मानाबाद शहरात वास्तव्यास असलेल्या सोमनाथ छगन काळे यांचे त्यांच्या मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पारधी समाजातील काही पुढाऱ्यांनी जात पंचायत भरविली होती. त्यात सोमनाथला २ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यापैकी २० हजार रुपये दंडदेखील वसूल केला. मात्र, उर्वरित १ लाख ८० हजार रुपये वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे तगादा लावला होता. हे पैसे देण्यास विलंब केल्यास घृणास्पद शिक्षेला सामोरे जावे लागेल, अशी धमकी त्यास सातत्याने देण्यात येत होती. याच त्रासाला वैतागून सोमनाथ व त्याच्या पत्नीने २२ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नातेवाइकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

यापैकी सोमनाथची प्रकृती गंभीर झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले. यादरम्यान अनिताच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, ५ ऑक्टोबर रोजी सोमनाथचा मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी जात पंचायतीच्या पंचांवर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मृतदेहासह नातेवाइकांनी आक्रोश केला. हा प्रकार सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक याठिकाणी दाखल झाले होते. इतरही पोलीस अधिकारी व कर्मचारी येथे मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तहसीलदार गणेश माळी यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला.

'तुझा गेम करून टाकीन'; धमकावून शिपायासोबत सुरक्षारक्षकाने केले अनैसर्गिक कृत्य

पंचांवर गुन्हे दाखल करून अटक करा 
उस्मानाबाद येथे घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आहे. यामागे जात पंचायतचा दबाव असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी २०१७ मध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनविला आहे. त्या कायद्यांतर्गत जात पंचायतीच्या पंचांवर गुन्हे दाखल व्हावेत व तत्काळ अटक व्हावी, अशी विनंती आपण जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. सोबतच पीडित परिवाराचे पुनर्वसन होण्याची गरज आहे.
- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जात पंचायत मूठमाती अभियान

शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला

Web Title: 'pay fine otherwise be ready for disgusting punishment'; Young man commits suicide due to Jat Panchayat harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.