coronavirus: 7 new corona infected patients in Osmanabad | coronavirus : उस्मानाबादेत ७ नवीन बाधीत रुग्णांची भर

coronavirus : उस्मानाबादेत ७ नवीन बाधीत रुग्णांची भर

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढू लागले आहे. शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी ७ नवीन बाधितांची भर जिल्ह्यात पडली. यातील ५ बाधित हे कळंब शहरातील पारधी पेढीतील असून, ते नुकतेच कुर्ल्याहून परतले होते. एक बाधित हा कळंब तालुक्यातील शिराढोन येथील असून, त्याचा प्रवास इतिहास शोधला जात आहे. तर उमरगा तालुक्यातील बेडगा येथील आधीच्या बाधिताच्या संपर्कातील एकजण पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, शनिवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यात एकूण ७१ बाधितांची नोंद झाली आहे. यातील १९ जणांना सुटी देण्यात आली असून, २ बाधित हे मयत झाले आहेत. सध्या ५० जणांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: coronavirus: 7 new corona infected patients in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.