Called by a friend on social media, she came; He was raped and released | सोशल मिडीयातील मित्राने बोलाविले, ती आली; त्याने अत्याचार करून सोडून दिले 

सोशल मिडीयातील मित्राने बोलाविले, ती आली; त्याने अत्याचार करून सोडून दिले 

ठळक मुद्देनाव-गावाचा पत्ता नसतानाही केवळ सोशल मिडीयावर बोलण्यातून जुळले होते सूतबोलण्याला भुललेल्या तरुणीने मागचा-पुढचा विचार न करता थेट उस्मानाबाद गाठले

उस्मानाबाद : मोबाइलवरून अनोळखी लोकांसमवेत होणारी मैत्री किती विचित्र व घातक वळणावर पोहोचतेय, याची अनुभूती सोलापूरच्या एका १९ वर्षीय तरुणीस गुरुवारी आली. अशाच पद्धतीने ओळख झालेल्या मित्रास भेटण्यासाठी आलेल्या तिच्यावर त्याने अत्याचार करून सोडले. याबाबत उस्मानाबादपोलिसांत अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोलापूर शहरातील एका १९ वर्षीय तरुणीची उस्मानाबाद येथे राहणाऱ्या एका अनोळखी तरुणासोबत मोबाइलवरून ओळख झाली होती. साधारणत: महिनाभरापूर्वीच अनपेक्षित झालेल्या बोलण्याने त्यांच्यातील संवाद वाढीस लागला. महिनाभरातच त्यांचे बोलणे इतके वाढले की एकमेकांचे तोंडही न पाहिलेल्या व खरे नावही माहीत नसलेल्या या दोघांचे सूत जुळून आले. मग उस्मानाबादेतील या तरुणाने तिला भेटीचा आग्रह धरला. तिलाच उस्मानाबादला भेटण्यासाठी ये, असे निमंत्रण त्याने दिले. त्याच्या बोलण्याला भुललेल्या तरुणीने मागचा-पुढचा विचार न करता ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आईला टॉप शिऊन येते, अशी थाप मारुन घर सोडले. बसने तिने थेट उस्मानाबाद गाठले. बसस्थानकावरच त्यांची पहिली भेट झाली. येथून त्या तरुणाने कारमधून शहरातीलच एका लॉजवर तिला नेले. याठिकाणी आपण पुण्याला जाऊन लग्न करू, अशी थाप देत दोन वेळा अत्याचार केला. रात्री उशिरापर्यंत ते येथे एकत्र राहिले. नंतर त्या तरुणाने कारनेच ३१ रोजीच्या पहाटे २ वाजता या तरुणीस सोलापुरात तिच्या घराजवळ आणून सोडले व पसार झाला.

पोलिसात गुन्हा दाखल
हा प्रकार घरी समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी उस्मानाबाद गाठून येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात तरुणावर कलम ३७६ अन्वये अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Called by a friend on social media, she came; He was raped and released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.