शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

व्हिएतनामच्या मुलांची  शाळा  ‘टी.व्ही.’त भरते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:21 IST

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

- रणजितसिंह डिसले , प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळाआपण रोजच टीव्हीवरील मालिका, काटरून्स पाहत असतो. आज बहुतांश जणांच्या घरी टीव्ही आहे. पण तुम्हांला माहितीय का, याच टीव्ही च्या माध्यमातून व्हिएतनाम मध्ये मुलांची ऑनलाईन शाळा भरते. व्हिएतनाम हा आपल्या आशिया खंडातील एक छोटासा देश आहे. देश जरी चिमुकला असला तरी इथले लोक मात्र फार कष्टाळू आहेत. आपल्याकडे कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी  तिकडे   मात्र शाळा सुरु आहेत. आन्ह फुंग हा नावाची एक शिक्षिका आणि तिचे टीव्ही वरील ऑनलाईन क्लास प्रचंड लोकप्रिय आहेत. आपल्या सारखाच तिकडेही घराघरात टीव्ही पोहचला आहे. आठवड्यातून 2 दिवस ती इंग्रजीचा क्लास घेते. त्या  देशातील मुलानाही आपल्यासारखीच इंग्रजीची भीती वाटते.पण ही शिक्षिका ज्या पद्धतीने शिकवते, त्यामुळे अनेकांच्या मनातून इंग्रजीची भीती गेलीय. जो घटक शिकवायचा आहे त्याचे नाट्यीकरण ती  करते. यासाठीचे कलाकार तिच्या गावातील किंवा इतर देशातील  तिचे शिक्षक मित्र असतात.  त्या त्या कलाकारांना ती संवाद लिखित स्वरुपात पाठवते आणि व्हिडिओ कसा हवाय ते सांगते. त्यांनी पाठवलेल्या  व्हिडिओ मध्ये मग ती काही बदल करते आणि टीव्हीवरील तिच्या कार्यक्रमात दाखवते. टीव्ही च्या माध्यमातून सुद्धा किती चांगल्या पद्धतीने शिकवता येत हे  तिने दाखवून दिल आहे. म्हणजे बघा टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन शाळा भरवता येते. मग तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगाल का, असे टीव्ही च्या माध्यमातून तुमचे ही ऑनलाईन वर्ग घ्यायला?