लाटण्याने  लाटून पानांचं चित्र काढायचं  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 03:57 PM2020-05-25T15:57:11+5:302020-05-25T15:59:45+5:30

थोडक्यात काय, तर लाटण्याने पानं लाटण्याची मज्ज!

make leaf prints - DIY - stay at home | लाटण्याने  लाटून पानांचं चित्र काढायचं  का ?

लाटण्याने  लाटून पानांचं चित्र काढायचं  का ?

googlenewsNext
ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

घरात बसून बसून जाम बोअर झालंय हे ठाऊक आहे पण आता करणार काय? एक काम करूया आज जरा वेगळं काहीतरी ट्राय करूया. पानं, रंग आणि लाटण्याचा वापर करून काही करता येईल का? चला, बघूया!
साहित्य: 
कुठल्याही झाडाची कुठलीही पाच पानं. निरनिराळी झाडं नसतील तर एकाच झाडाचीही चालतील. (झाड शोधण्यासाठी घराबाहेर पडायचं नाही.) कुठलेही आवडते पाच रंग, पांढरा कागद, लाटणं . 


कृती: 
1) पानांना मागच्या बाजूने रंग लावा. 
2) रंग ओला असतानाच रंगाच्या बाजूने पान पांढऱ्या  कागदावर ठेवा. 
3) आता त्यावर लाटणं ठेवून पोळ्या लाटतात तसं हळूहळू लाटणं पानावरुन फिरवा. 
4) हे करताना काळजी घ्या. लाटणं जोरजोरात फिरवलंत तर पान हलेल आणि ठसा नीट येणार नाही. 
5) पुरेसा दाब लाटण्याने पडलाय असं वाटल्यावर लाटणट हळूच बाजूला करा आणि पण हलक्या हाताने काढून घ्या. 
6) अशा पद्धतीने कागदावर हवे तेवढे पानांचे ठसे काढून घ्या. झालं तुमचं सुंदर चित्र तयार.  

Web Title: make leaf prints - DIY - stay at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.