शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यात सोनं आहे, तुमच्या घरातल्या कचऱ्यातही ! -शोधा तर खरं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 14:20 IST

तुम्ही शहरात राहात असलात, तरीही तुमच्या कचऱ्याचं  खत तुम्हाला करता येईलच!

ठळक मुद्दे घरातला कचरा आपल्याला घरात जिरवता येतो. आपलं शहर / गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याकडून तेवढीच थोडी मदत!

- गौरी पटवर्धन

तुमच्या घराला छोटी तरी बाल्कनी आहे का? किंवा अंगण? किंवा सोसायटीत एखादा कोपरा तुम्ही वापरू शकता का? किंवा गच्चीत? तर त्यातून तुम्हाला एक भारी प्रकल्प करता येईल. त्यासाठी साहित्य जे लागणार आहे ते म्हंटलं तर साधं आहे आणि म्हंटलं तर तुम्हाला घरातून जरा खटपट करून मिळवायला लागेल असं आहे. कारण त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुना माठ किंवा बादली किंवा टब. अर्थात यातलं काही नवीन मिळालं तरी आपल्याला चालणार आहे, पण आपल्याला कोण भलते उद्योग करायला नवीन माठ किंवा बादली देईल? म्हणून जुन्या वस्तू!तर आपल्याला जो माठ / बादली / टब मिळेल त्याला बाजूला छोटी भोकं पाडून घ्यायची. त्यामुळे बादलीत हवा खेळती राहते. हे आपलं कंपोस्ट बिन. किंवा खताचा डबा. आता त्याच्या तळाशी साधारण एक इंच भुश्याचा थर द्यायचा. घरात भुसा नसेल तर नारळाच्या शेंड्या घाला किंवा एखाद्या पुठ्ठयाच्या खोक्याचे बारीक तुकडे करून ते घाला. आता घरात ज्या कुठल्या पालेभाज्या निवडतील त्यांची देठं, सोललेल्या भाज्यांची सालं, फ्लॉवर सारख्या भाजीचा उरलेला जाडजूड देठ, चहा पावडरचा चोथा अशा सगळ्या गोष्टी तुम्ही या कंपोस्ट बिन मध्ये टाकू शकता. फक्त हा ओला कचरा टाकतांना काही गोष्टींची काळजी घ्यायची.1. सगळा कचरा बारीक तुकडे करून टाकायचा2. त्यात  ओला असणारा कचरा टाकायचा नाही. कंपोस्ट बिनमध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही.3. प्रत्येक वेळी हा स्वयंपाकघरातला कचरा टाकला की त्यावर सगळा कचरा झाकला जाईल इतका भुसा पसरायचा. त्यावर खत होण्याची प्रक्रिया लौकर होण्यासाठी गुळाचं पाणी, आंबट ताक, थोडं डाळीचं पीठ/बेसन, गोमूत्र, शेणाचं पाणी यातलं जे काही तुम्हाला मिळेल ते घालायचं.4. कंपोस्ट बिन झाकून ठेवायचं.5. चांगल्या तयार होणा?्या खताला अजिबात घाण वास येत नाही, पण काही वेळा त्यात अळ्या होऊ शकतात. त्या त्रसदायक नसतात.6. आपलं कंपोस्ट बिन पूर्ण भरलं की आठ दिवस जाऊ द्यायचे. त्यानंतर दर दोन दिवसांनी काठीने त्यातला कचरा ढवळायचा. बाहेर न सांडता जमेल तेवढा खालीवर करायचा.

उन्हाळ्याच्या दिवसात साधारण एक महिना ते चाळीस दिवसांनंतर तुम्हाला वाळवलेल्या चहा पावडर सारखं दिसणारं खत मिळेल. हे खत तुम्ही तुमच्या घरच्या झाडांना घालू शकता. ही प्रक्रिया तुम्हाला सतत चालू ठेवायची असेल तर एका वेळी दोन - तीन कंपोस्ट बिन बनवा. एक पूर्ण भरली की दुसरी वापरायला सुरुवात करायची. अशाने घरातला कचरा आपल्याला घरात जिरवता येतो. आपलं शहर / गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याकडून तेवढीच थोडी मदत!