चला, आज रंगपंचमी खेळू , ताबडतोब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 07:50 IST2020-04-23T07:50:00+5:302020-04-23T07:50:02+5:30
असं काय बघताय, चला, आज घरीच खेळूयात!!

चला, आज रंगपंचमी खेळू , ताबडतोब !
यंदा तुम्हाला रंगपंचमी नीट खेळताच आली नाही, हो ना! दरवर्षी सारखं पिचकारीत रंग भरून मस्त सगळ्यांवर उडवायला मिळालेच नाहीत ना. किंवा मिळाले असतील तर फारवेळ नाहीच. मग आज आपण रंग आणि पिचकारीनेच काहीतरी धमाल करूया!
साहित्य:
पांढरे कागद, छोटी पिचकारी, पोस्टल रंग, वर्तमानपत्र
कृती :
1) जुने वर्तमानपत्र जमिनीवर पसरावा.
2) त्यावर पांढरा कागद ठेवा.
3) आता छोट्या पिचकारीत तुम्हाला आवडेल तो रंग भरा. रंग जरा दाट असूदेत.
4) आणि मग पांढ?्या कागदावर नेम धरून मस्त रंग मारा.
5) त्यानंतर दुसरा रंग भरा, मग तिसरा, मग चौथा. असे तुम्हाला हवे तेवढे रंग पिचकारीत भरून तुम्ही उडवू शकता.
6) रंग कागदावर कसेही पडू द्या. तुमचे रंग उडवून झाले की बघा, त्या रंगाच्या अगणित पिचका?्यांमधून सुंदर चित्र तयार झालेलं असेल.
7) हा कागद व्यवस्थित वाळू द्या.
8) आणि हो, पांढरा कागद न विसरता वर्तमानपत्रवरच ठेवायचा. नाहीतर जमीन रंगीत होईल आणि बोलणी खावी लागतील.