आपण घरात बसलो , पण पक्ष्यांना खाऊ कोण देणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 07:00 IST2020-04-24T07:00:00+5:302020-04-24T07:00:08+5:30
गॅलरीत येतात त्या पक्ष्यांसाठी बर्ड फीडर

आपण घरात बसलो , पण पक्ष्यांना खाऊ कोण देणार ?
- अक्षरा सोनवणे,
आता कोरोना व्हायरसमुळे सगळे घरात आहेत. अभ्यास करून, टीव्ही बघून, गेम खेळून आपण सगळेच घरात खूप बोअर होतोय. मी पण होतेय.
खूप कंटाळून एके दिवशी मी आमच्या गॅलरीमध्ये उभी राहून गंमत बघत होते. आईने खायला शेवपुरी केली होती, ती खात होते. बहुतेक थोडी शेव सांडली खाली. खूप वेळाने मी परत गेले तर एक कावळा गॅलरीमध्ये पडलेली शेव खात होता.
मला खूप वाईट वाटलं. मला वाटल< की एवढ्या उन्हात या पक्ष्यांना कुठेच नाही मिळालं, तर ते काय करत असतील? त्यांना तर कोणीच खायला देत नसेल. म्हणून मी माङया पप्पांच्या मदतीनं बर्ड फीडर बनवायचे ठरवले. ते कसं बनवतात हे मी युट्यूबवर शोधून काढलं.
सोप्पं होतं. सांगू का काय केलं ते.?
कृती
1) एक बाटली घेऊन तिच्या कॅपजवळ एक छोटे छिद्र पाडले म्हणजे टाकलेले धान्य खाली येईल.
2) एक प्लॅस्टिकची प्लेट घेऊन त्यावर ती बाटली उलटी ठेवून एका स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने जोडली.
3)बाटलीच्या मागच्या बाजूला समान अंतरावर दोन छिद्रं पाडून त्यातून दोरी बाहेर काढून बाटली टांगण्यासाठी सोय केली.
झालं माझं बर्ड फीडर तयार!
आता ते मी आमच्या गॅलरीत लावलंय!