काय बिघडलं? जरा जागचं हलवा की तुमचं ढू..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:00 IST2020-04-01T18:59:17+5:302020-04-01T19:00:47+5:30
एखादा सोप्पा; पण सहज करता येणारा पदार्थ करा.. - आणि हो, एक काम तर कराच करा : प्लीज, तुमचा पसारा थोडा तरी आवरा!

काय बिघडलं? जरा जागचं हलवा की तुमचं ढू..
काल ना मधुराच्या आईची एमेल आलीये ऊर्जाला. ती म्हणते, ‘‘हे काय, तुम्ही मुलांना अमुक करान अमुक करा अशा इतक्या आयडिया देताय.. पन त्यांना थोडं कामालाही लावा की!’’ - आता म्हणजे काय करायचं हे काही तिने सांगितलेलं नाही.
पण एक नक्की, मधुराला तिची आई चांगलीच कामाला जुंपत असणार :-)
तर ते असो, काय हरकत आहे, तुम्ही थोडं कामही केलंत तर?
म्हणजे घरातला केर काढा, कपडे वाळत घाला, वाळलेल्या कपडय़ांच्या घडय़ा घाला, एखादा सोप्पा; पण सहज करता येणारा पदार्थ करा..
- आणि हो, एक काम तर कराच करा : प्लीज, तुमचा पसारा थोडा तरी आवरा! वह्या-पुस्तकं तर फेकून दिलीच असतील तुम्ही एव्हाना,
म्हनजे ती कुठे आहेत, त्यांची अवस्था काय आहे यातलं काही म्हणता काही आठवतसुद्धा नसेल तुम्हाला.. तर त्यांच्याकडे जरा बघा. ते ढीग आवरा. कपडे.. बाबाबा.. ते तर ढीगच्या ढीग असतील, त्यांच्या आत शिरून तुम्हाना न होणारे कपडे बाजूला काढा. आईला विचारून त्यंचं
काय करायचं ते ठरवा. ही यादी अगदी मारुतीच्या शेपटासारखी वाट्टेल तेवढी लांबवता येऊ शकते. पन तुम्ही सुरुवात तरी करा!