Kids play @ home : बोअर होतं म्हणता ? या घ्या आयडिया आणि करा फुल धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:40 IST2020-04-01T19:37:03+5:302020-04-01T19:40:39+5:30
बोअर झालं असं म्हणायलासुद्धा तुम्हाला वेळ नाही मिळणार, काय?

Kids play @ home : बोअर होतं म्हणता ? या घ्या आयडिया आणि करा फुल धमाल
आपल्याला बोअर होतंय म्हणून उगाच चिडचिड करायची नाही, हे कालच सांगितलंय. आयडियाच हव्यात ना तुम्हाला, या घ्या.. एखादा किस्सा घडला आहे त्यावरून गोष्ट तयार करून सांगा. उदा. आईची गोष्ट, बाबाची गोष्ट, आजीची गोष्ट. अशा गोष्टी तयार करता येतील.
या गोष्टी तयार करायच्या आणि त्या घरातल्यांना रंगवून सांगायच्या. मराठीतली गोष्ट हिंदीतून सांगायची. किंवा हिंदीतली गोष्ट मराठीत सांगायची. आपल्या मनानं गोष्ट लिहून काढायची. गोष्टीचं चित्रंही आपणच काढायचं. आणि गोष्टीखाली आपलं स्वत:चं नाव लिहायचं. गोष्टीचं नाटक तयार करायचं. गोष्ट संवादात लिहून काढायची. गोष्टीचं गाणं तयार करायचं आणि ते म्हणून पाहायचं.
घरातल्या घरात शाळा शाळा, दुकान दुकान खेळा. पोलीस स्टेशन, डॉक्टर असं काहीही खेळता येतं. हा खेळ खेळताना लगेच प्रसंग उभा करावा लागतो. संवाद म्हणावे लागतात. म्हणून हा खेळ खेळताना मजा
येते. वेगवेगळ्या रंगाच्या डाळी घेऊन रांगोळी काढा. चित्रं काढा. बादली बॉलचा खेळ खेळा. रोज या खेळाचा कठीणपणा वाढवत न्या. पहिल्या दिवशी मोठी बादली मोठा बॉल. हळू हळू बादली आणि बॉलचा आकार कमी करत न्या. तसेच अंतरही वाढवत न्या. जसजसा हा खेळ कठीण होतो तसा तो
खेळायला मजा येते. घरात फळा असेल तर खडूनं चित्रं काढा. फुली गोळा, सापशिडी, कॅरम, चेस, लुडो, पत्ते असे बैठे
खेळ खेळा. आई-बाबांशी आलटून पालटून खेळा. ही यादी पाहिजे तेवढी वाढू शकते.