आज आपण शिकणार आहोत, जिराफाचा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 07:40 AM2020-05-31T07:40:00+5:302020-05-31T07:40:06+5:30

लांबटांग्या..

exercise at home- giraffe exercise | आज आपण शिकणार आहोत, जिराफाचा व्यायाम

आज आपण शिकणार आहोत, जिराफाचा व्यायाम

googlenewsNext
ठळक मुद्देकसा कराल हा व्यायाम?

प्राण्यांचे व्यायाम करायला, कश्शी भारी मजा येतेय की नाही? म्हणूनच गेले काही दिवस झाले, मी तुम्हाला प्राण्यांचे व्यायाम शिकवते आहे.
आज आपण शिकणार आहोत, जिराफाचा व्यायाम. जिराफ खूप उंच असतो. जगात सध्या अस्तित्वात असलेल्या चतुष्पाद प्राण्यांतला तो सर्वात उंच प्राणी तर आहेच, पण सर्वात मोठा रवंथ करणारा प्राणीही आहे. 
जिराफाचे बारकुडे वाटणारे पाय आणि मान यामुळे तो लुकडा-सुकडा वाटतो, पण जिराफाचं वजन किती असतं, तुम्हाला माहीत आहे? 
या लुकडय़ा-काटकुळ्या वाटणा:या जिराफाचं वजन तब्बल 1200 किलोर्पयत असतं. आणि आपल्या या काटकुळ्या पायांनी एवढं वजन तो सहजपणो पेलतो.
तुम्हाला वाटत असेल, मग तोही हत्तीप्रमाणो हळूहळू पळत असेल. पण तीन हजार किलोचा हत्तीही वेळ आली की वेगात पळू शकतो आणि जिराफ तर ताशी तब्बल 56 किलोमीटर वेगानं पळू शकतो. हा शाकाहारी लंबूटांग दिवसभरात केवळ दोन-अडीच तासच झोपतो आणि तेही उभ्या उभ्या.
जिराफ कायम मानेचा व्यायाम करत असतो आणि त्याची मान हेच जणू त्याचे हात असतात. हा लांबटांग्या आणि हाडूक उच्च व्यायाम कसा करायचा ते आपण आज पाहू. 
कसा कराल हा व्यायाम?


1- आधी निट सरळ उभे राहा.
2- दोन्ही हातांची गुंफण करा.
3- हात डोक्यावर न्या.
4- नागीण डान्स करताना हात आपण जसे मागे पुढे करतो, तसे करत चाला.
5- सोबत मानही मागे-पुढे करा.
यामुळे काय होईल?
1- हातांतली ताकद वाढेल.
2- खांदे भरभक्कम होतील.
3- मानेचा व्यायाम होईल.
4- मानेचे स्नायू बळकट होतील.
5- मानेचं दुखणं असल्यास ते कमी होऊ शकेल. (पण जास्त दुखायला लागलं तर मान मागे-पुढे करू नका.)
6- खांद्यातल्या सांध्यांची लवचिकता वाढेल. 
7- पाठीचाही व्यायाम होईल.
असा हा जिराफ. त्याचे पायाचे व्यायामही फार भारी आहेत. तो चालताना आधी त्याचे दोन्ही पाय उचलून पुढे टाकतो आणि नंतर मागचे दोन्ही. तो व्यायाम कसा करायचा, ते मात्र तुमचं तुम्ही शोधून काढा.
- तुमचीच ‘लांबटांगी’, ऊर्जा

Web Title: exercise at home- giraffe exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.