शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरूच झाली नाही यावर्षी....तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 16:03 IST

असा का बरं विचार करता? उशिरा होईल, पण शाळा सुरू होईल, असं आपण धरून चालू; काय?

ठळक मुद्देशाळेत जाऊन तुम्हा मुलांना मस्त दंगा करता येणार आहे.

आमची शाळा सुरूच झाली नाही यावर्षी तर? घरात बसून बसून कंटाळा आलाय, सारखं काय काहीतरी शिका? आईबाबा तर थोडे दिवसांनी ऑफिसला जातील शाळा चालूच झाली नाही तर आम्ही मुलांनी काय करायचं?  अश्विन काळसेकर , सांगली 

अश्विन, शाळा परत सुरु होणारच नाही असा विचार करू नकोस. तुम्हा मुलांना खूप कंटाळा आलाय, हे अगदीच मान्य आहे आणि खरंतर मुलांचं सगळ्यात जास्त कौतुक आहे सध्याच्या कोरोनाच्या काळात. तुम्ही मुलांनी जे धैर्य दाखवलं आहे ते तर मोठ्या माणसांनाही दाखवता आलेलं नाही. त्यामुळे आपण सकारात्मक विचार करूया. शाळा उशिरा सुरु होतील पण सुरु नक्की होतील. कदाचित पुढच्या दिवाळी, नाताळच्या सुट्ट्या यंदा मिळणार नाहीत. म्हणजे अशी शक्यता आहे, कारण शिक्षण विभागाने अजून शाळांच्या बाबतीत काहीच जाहीर केलेलं नाहीये. पण समजा शाळा सुरूच झाल्या नाहीत तू म्हणतोस तसं तर काय बरं होईल? एक वर्ष सगळ्यांचंच शिक्षण थांबेल. थांबू देत. त्याने काहीही फरक पडत नाही. राहता राहिला आईबाबा ऑफिसला जायला लागल्यावर तुम्हाला मुलांनी काय करायचं हा प्रश्न तर तो खरंच बिकट आहे. आता सगळे घरात आहेत त्यामुळे ठीक आहे. पण उद्या समजा आईबाबा ऑफिसला जायला लागले आणि मुलांच्या शाळा चालू झाल्या नाहीत तर तुम्हा मुलांची जबाबदारी अजूनच वाढणार आहे. मी तुला घाबरवत नाहीये पण आपण एका अत्यंत कठीण काळातून जातोय त्यामुळे काय काय होऊ शकेल याचा जसा तू विचार करतो आहेस तसा तो केलाच पाहिजे. पण ऑफिस सुरु झालं आणि शाळा नाही तर आईबाबा काहीतरी पर्यायी व्यवस्था करतीलच ना. आलटून पालटून ऑफिसला जातील किंवा मग आजीआजोबा घरी येऊन राहतील. शिवाय सरकारही यावर काहीतरी विचार करेलच. उत्तरही शोधेल. त्यामुळे तू काळजी करू नकोस.

 अगदी आईबाबांपासून सरकारपयर्ंत सगळेच करतील!आणि हो, शाळा होतील सुरु! शाळेत जाऊन तुम्हा मुलांना मस्त दंगा करता येणार आहे. एकत्र डबा खाता येणार आहे, गप्पा मारता येणार आहेत. हे सगळं होणार आहे.