फिरण्यासाठी 'या' ठिकाणापेक्षा चांगलं ठिकाण शोधून सुद्धा सापडणार नाही, लगेच बॅग पॅक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 05:35 PM2020-01-13T17:35:04+5:302020-01-13T17:40:37+5:30

हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी जर तुम्ही  वेगवेगळ्या ठिकांणी जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.

You can't even find places to look for better than 'this' place to pack, pack a bag right away | फिरण्यासाठी 'या' ठिकाणापेक्षा चांगलं ठिकाण शोधून सुद्धा सापडणार नाही, लगेच बॅग पॅक करा

फिरण्यासाठी 'या' ठिकाणापेक्षा चांगलं ठिकाण शोधून सुद्धा सापडणार नाही, लगेच बॅग पॅक करा

Next

( image credit- commanswikimedia.org)

हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी जर तुम्ही  वेगवेगळ्या ठिकांणी जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्याठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला खवय्येगिरीचा तसंच ऐतिहासीक वास्तु पाहण्याचा आनंद घेता येईल. जर तुम्हाला त्याच ठिकाणी फिरायला जाण्यचा कंटाळा आला असेल तर भारतातल्या ठिकाणी पर्यटनाचा  आनंद घेऊ शकता.  कारण नवीन वर्षाची सुरूवात आणि  पर्यटन स्थळांवर असलेले फेस्टिवल्सचे  आयोजन यांचा तुम्ही पुरेपूर आनंद घेऊ शकता. 

Image result for jaisalmer festival(image credit- the statesman)

भारतातील राजस्थामध्ये तुम्ही या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात फिरायला जाल तर  तुम्हाला या राज्यातील पर्यटन स्थळांचे वेगळं रुप अनुभवण्यास मिळेल. भारतातील सगळ्यात मोठं हॉटेल राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे आहे.  भारतातल्या सगळ्या महागड्या हॉटेल्सपैकी ते हॉटेल आहे. शिवाय राजस्थानमध्ये सध्या जैसलमेर रेत फेस्टिवल सुरू होणार आहे. 

Image result for jaisalmer festival

हा फेस्टिवल २९  जानेवारीला सुरू होणार आहे.  हा फेस्टिवल २ फेब्रुवारीपर्यंत असेल. या ठिकाणंचे आकर्षण असलेल्या नारायण हवेली आणि नाशना हवेली या ठिकाणी  हा फेस्टिवल असणार आहे. या फेस्टिवल मध्ये हैरिटेज वॉक, आर्ट एग्जिबिशन, वर्ल्ड म्यूजिक कन्सर्ट्स, सूफी म्यूजिक  तसंच हेरीटेज हॉटेल्सचा आनंद सुद्धा तुम्हाला  घेता येईल. 

Image result for jaisalmer festival(image credit-hinglajtoursandtravels)

ज्या दिवशी हा फेस्टिवल सुरू  होतो. त्या दिवसांपासून  शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला अनेक अनुभव मिळतील फिल्म स्क्रीनिंग, क्रिएटिव वर्कशॉप, म्यूजिक नाइट तसंच पारंपारीक नृत्य पाहण्याचा अनुभव घेता येईल. हिवाळ्यात या फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. राजस्थानमधीस सौंदर्य पाहत असताना जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर  मनसोक्त फोटोग्राफी करू शकता.

Image result for jaisalmer festival(image credit- cleartrip.com)

या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनने सुध्दा जाऊ शकता.  जोधपूर, उद्यपूर या स्थानकांवर जरी गेलात तरी तुम्हाला जैसलमेरसाठी  वाहतूकीची साधन उपलब्ध असतील तर तुम्ही कारने जाणार असाल तर  तुम्हाला या ठिकाणी पोहोचणं खूपचं सोपं असेल. त्यासाठी तुम्ही जोधपुरपासून सुद्धा काहीवेळात या ठिकाणी पोहोचू शकता. जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर  जैसलमेर विमानतळ जवळ आहे. जैसलमेरपासून तुम्ही कॅबने या फेस्टिवलला पोहोचू शकता. 

Web Title: You can't even find places to look for better than 'this' place to pack, pack a bag right away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.