तुम्हाला जर अ‍ॅडव्हेंचर आवडत असेल आणि तुम्ही ट्रिप प्लॅन करताना अ‍ॅडव्हेंचर्स ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबाबत सांगणार आहोत. हिमाचल प्रदेश निसर्गसौंदर्यासोबतच अ‍ॅडव्हेंचर्स ट्रिपसाठी ओळखलं जातं. या राज्यामध्ये एक खास ठिकाण आहे, जे अ‍ॅडव्हेंचरसोबतच निसर्गसौंदर्यासाठी ओळखलं जातं. या ठिकाणाचं नाव आहे, तत्तापानी. शिमलापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर असलेलं तत्तापानी आहे. येथे तुम्ही अनेक अ‍ॅडव्हेंचर ठिकाणांचा आनंद घेण्याची इच्छा पूर्ण करू शकता.  येथे सतलज नदीच्या थंड प्रवाहातून गरम पाण्याचा झरा वाहतो. त्यामुळे या ठिकाणाला तत्तापानी असं म्हटलं जातं. कारण तत्तापानी म्हणजे, गरम पाणी. 

असं सांगितलं जातं की, येथील स्थानिक लोकांव्यतिरिक्त हे ठिकाण जास्त कोणाला माहीत नव्हतं. त्यानंतर हळूहळू पर्यटकांमुळे या ठिकाणाबाबत अनेक लोकांना समजले. तुम्हीही तत्तापाणीला भेट देऊ शकता. तत्तापानीची ट्रिप बजेटमध्ये असून ही नक्कीच अ‍ॅडव्हेंचर्स ठरू शकते. येथे अनेक पर्यटक येत असतात. तसं पाहायला गेलं तर तत्तापानीचा दौरा तुम्ही कधीही करू शकता. परंतु, खासकरून थंडीमध्ये येथे जाण्याची गंमत काही औरच...

अ‍ॅडव्हेंचर ड्राइव्ह 

शिमलापासून तत्तापानीमध्ये जवळपास 50 किलोमीटर अंतरावर अ‍ॅडव्हेंचर ड्राइव्हचा पूर्ण आनंद घेऊ शकता. या संपूर्ण रस्त्यामध्ये तुम्हाला मनसोक्त निसर्गाचा आनंद घेता येईल. याव्यतिरिक्त येथे अनेक धार्मिक स्थळही आहेत. या ठिकाणी अनेक बाइकर्स ग्रुप्स ड्राइव्ह करण्यासाठी येत असतात. तसेच येथे पर्टकर सतलुज नदीच्या किनाऱ्यावर सायकलिंगचाही आनंद घेतात. 

ट्रेकिंगची गंमत 

जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुमच्यासाठी हे ठिकाण अत्यंत खास आहे. देवदारच्या जंगलांमध्ये ट्रेकिंग करण्याची वेगळीच गंमत आहे. ट्रेकिंग दरम्यान रस्त्यामध्ये अनेक वॉटरफॉल आहेत. जे पाहून तुम्ही खरचं प्रसन्न व्हाल. तत्तापानीमध्ये ट्रेकिंग करण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येत असतात. 

(Image credit : Thrillophilia)

रिव्हर राफ्टिंगचा रोमांचित करणारा अनुभव 

तत्तापानीमध्ये देशभरातून अनेक लोक रिवर राफटिंगचा आनंद घेण्यासाठी येत असतात. सतलज नदीमध्ये रिवर राफ्टिंग लोटीपासून सुरू होते आणि चाबाला संपते. सतलज नदीच्या निळ्याशार पाण्यामध्ये राफ्टिंग करण्याची वेगळीच गंमत आहे. याव्यतिरिक्त तत्तापानीमध्ये बोटिंग करण्याची बातच न्यारी आहे. 

Web Title: You can plan adventure trip to tattapani in himachal pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.