शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

मी एकटी भटकते, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 8:53 AM

बारावीच्या सुट्टीत ‘जरा मोकळेपणा’ने जगून बघू म्हणून माधवी पहिल्यांदा एकटीने ट्रेकिंगला गेली आणि मग तिला वेडच लागलं. - एकटीने भटकण्याचं वेड! ती म्हणते, ‘ ग्रुपसोबत असतो तेव्हा आपण उघड्या डोळ्यानं नवं जग पाहत नाही. आपलं आपल्याशी बोलणं होतंच असंही नाही. एकटीनं फिरताना ते सारं भेटतं..’

- माधवी शहाएकटीनं प्रवास करणं म्हणजे स्वत:च स्वत:ला दिलेली ट्रीट असते. अशी संधी फार काम मुलींना मिळते. इतरांसारखीच माझीही ट्रेकिंगपासून फिरायला जायची सुरु वात झाली. बारावीची परीक्षा संपली आणि लांब पल्ल्याचा प्रवास करावा असं वाटू लागलं. त्यापूर्वी मी असा प्रवास केला नव्हता. वयाचा तो टप्पाही तसाच असतो. आई-वडिलांच्या सुरक्षीत कवचातून बाहेर पडायची धडपड असते. माझंही तसंच काहीतरी सुरु झालं होतं. बारावीनंतरच्या सुटया सुरु होताच मनात एकप्रकारची चलबिचल सुरु होती. त्याला मोकळी वाट करून देण्यासाठी ट्रेकिंग हा योग्य पर्याय वाटू लागला. उत्तराखंडला जाणाऱ्या ग्रुपबरोबर मी ट्रेकिंगला गेले. आई-वडिलांनी मला वाढवताना हे कर, हे करू नकोस असं कधीच सांगितलं नाही. खरंतर मी त्यांची एकुलती एक मुलगी पण त्यांनी कधीही माझी अतिकाळजी, अतिलाड केले नाहीत. मला जे जे करावंसं वाटतंय ते ते करू दिलं. त्यामुळेच कि काय मला स्वत:बद्दल विश्वास वाटू लागला.

उत्तराखंडला ट्रेकिंग केल्यानंतर मी या प्रदेशाच्या मनापासून प्रेमात पडले. मग हिमाचलमध्येही ट्रेक केला आणि लक्षात आलं कि जग किती सुंदर आहे. आपण आपल्या सुरक्षित वातावरणात बसून राहिलो तर आपल्याला हे कधीच बघायला मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागणार. माझंच मला खूप छान वाटत होतं. पुढचे तीनचार वर्ष मी उत्तरांचल आणि हिमाचलमध्ये खूप हिंडले. मग एकदा मी आणि सुधा नावाची माझी मैत्रीण आहे आम्ही दोघींनी मिळून रोड ट्रिपला जायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही नवीन भाग निवडला. कोलकाता ते सिक्कीम- भूतान आणि भूतानवरून आसाम-मेघालय आणि परत कोलकाता असा वेगवेगळ्या रस्त्यांवरून प्रवास केला. विमानाने वेळ वाचतो हे जरी खरं असलं तरी आपण एकदम उडी मारून मधला सगळा सुंदर प्रदेश वगळून टाकतो असं वाटतं आणि प्रवासात मग काहीतरी गमवल्यासारखं वाटू लागतं. रस्त्यानं जाताना त्या त्या भागातले लोक- तिथलं खानपान, राहणीमान समजतं आणि म्हणूनच आम्ही हा सगळं लांब पल्ल्याचा प्रवास रस्त्याने आणि त्या त्या भागातील स्थानिक वाहतूक व्यवस्थेनं करायचं ठरवलं. कोलकात्यावरून आम्ही दोघी बसने सिलिगुडीला गेलो तिथून गंगटोक- जलदोपाराला गेलो भूतानच्या बॉर्डरवरील फर्शोलिंगला पोहोचलो. हा सगळं प्रवास शब्दात वर्णन करता येणार नाही असा होता. आजूबाजूला खूप वेगळी माणसं होती. स्थानिक बसने प्रवास करताना रोज वेगवेगळ्या लोकांशी ओळख होत होती. पुढे आम्ही थिंपूवरून अलीपूरद्वार ते गुवाहाटी हा परत वेगळ्याच रस्त्यांवरून प्रवास केला. गुवाहाटीवरून बसने शिलाँगला आणि चेरापुंजी गेलो. इथे आम्ही आमच्या प्रवासाला पूर्णविराम दिला आणि मग परत भूतान वगळून उलटा प्रवास सुरु केला. पंधरा दिवसांचा हा प्रवास खूप काही शिकवून गेला. त्या त्या गावात गेल्यावर जिथे जशी सोय होईल ताशा आम्ही राहिलो. आधी कुठलाही बुकिंग केलं नव्हतं. हॉटेलमध्ये राहण्याऐवजी गावातल्या स्थानिक लोकांच्या घरी राहणं पसंत केलं. गावात उतरल्यावर काहीजणांकडे चौकशी करून एखाद्या कुटुंबात आम्ही राहण्याची सोया कशी होईल हे बघितलं. या ट्रिपमुळे खरं समाजजीवन अनुभवायला मिळालं. हा प्रवास माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर मी एकटीने प्रवास करू लागले.

उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये मी ग्रुपबरोबर अनेकदा गेले होते. एकटीने प्रवास करताना मला परत याच ठिकाणी जावंस वाटू लागलं. ग्रुपबरोबर प्रवास करताना आपल्याला आवडणाºया ठिकाणी रेंगाळता येत नाही. एका विशिष्ट टप्प्यात, वेळेत अंतर पार करावं लागतं. त्यामुळे जी जी ठिकाणं मला आवडली होती त्या त्या ठिकाणी मी एकटी जाऊन छान निवांत राहिले. गंगोत्री, ऋ षिकेश ही माझी आवडती ठिकाणं झाली. आता मी दरवर्षी एकटीच गंगोत्रीला जाते. इथे खळाळत वाहणाºया गंगेशी एक अतूट असं नातं तयार झालाय. गंगेचं हे खळाळणारं रूप डोळयात साठवून ठेवत असते. वर्षातून चार दिवस गंगेच्या सान्निध्यात राहताना मनाला शांतता लाभते.

मी नुकतीच लडाखच्या पुढे स्पिती व्हॅलीमध्ये जाऊन आले. स्पितीचा प्रवास करायची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. स्पिती व्हॅलीमध्ये एकटीच फिरत असताना माझ्यासारखेच अनेक सोलो ट्रॅव्हलर भेटले, त्यात मुली पण होत्या. याभागात अनेक मॉनेस्ट्री आहेत. दिवसभर भटकंती रात्री मॉनेस्ट्रीमध्ये मुक्काम करत होते. स्पितीतील की नावाच्या मॉनेस्ट्रीमध्ये गेले असता त्यांनी एक बाउल -एक चमचा आणि जमिनीवर अंथरायला एक चादर दिली. हा बाऊल असा होता कि त्यात तुम्ही सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं सूप असं सगळं बाऊलमध्येच व्हायचं. कमीत कमी गोष्टींमध्ये आपण दैनंदिन गरज कशी भागवू शकतो हे मला इथे मॉनेस्ट्रीमध्ये शिकायला मिळालं. बुद्धाचं तत्वज्ञान रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून नकळतपणे शिकायला मिळत गेलं.

एकटी फिरताना आणि ग्रुपमध्ये फिरताना एक महत्वाचा फरक जाणवतो. ग्रुपमध्ये आपण अनेकांसोबत असतो. त्यांच्या सोबत अनेकदा जुळवून घ्यावं लागतं. तिथे आपण ग्रुपमध्येच अडकवून राहतो. उघड्या डोळ्याने बाहेरच जग बघणं होतं नाही. या उलट एकटे असतो तेव्हा आपण सजग असतो. आपण आजूबाजूच्या गोष्टींचा बारकाईने विचार करू लागतो. स्वत: बद्दलही विचार करायला तेव्हाच वेळ मिळतो. नेहमीच्या गजबजाटापेक्षा असा एकांतही कधी हवाच असतो. आईच्या पाठिंब्यामुळे मी असा प्रवास करू शकतेय. अनेक घरांमध्ये मुलींना असा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे घरातून बाहेर पडू शकत नाही.

अगदी टिपिकल पर्यटन स्थळी एकटी प्रवास करत असताना तिथे कोणत्या न कोणत्या टूर एजन्सी मार्फत आलेले अनेक पर्यटक भेटतात. मला असं एकटीलाच प्रवास बघून त्यांना मोठं आश्चर्य वाटतं. तुझे आई-वडील कसे काय एकटीला असे फिरायला सोडतात? असंही अनेकजण बोलून दाखवतात तर त्या उलट दुर्गम भागातील गावांमध्ये गेले असता तिथे कोणालाही मी अशी एकटी याचं आश्चर्य वाटत नाही.आजवरच्या प्रवासात कधी वाईट अनुभव आले नाहीत. एकटी फिरताना स्वत:ची स्वत:ला घ्यावी लागते. एकटीच असल्यामुळे सुरु वातीला रस्ते लक्षात ठेवावे लागायचे. या सवयीमुळे आता रस्ते आपोआप लक्षात राहू लागलेत. बायका एकटीने प्रवास करायला घाबरतात. रस्ता माहित नाही, चुकलो तर या भीतीने ग्रुपबरोबर प्रवास करायला त्यांना आवडतं. पण आता परिस्थिती बदलतेय. अगदी कमी पैश्यांमध्ये छान सोलो ट्रॅव्हल करणाºया माझ्यासारख्या अनेकजणी आहेत. ज्या बाईपणाचा कोणताही बाऊ न करता मस्तपैकी फिरत असतात, लिहीत असतात, फोटोग्राफी करतात. स्वत:चाच शोध घेण्यासाठी असा प्रवास मला स्वत:ला खूप गरजेचा वाटतो. ( शब्दांकन -मनस्विनी प्रभूणे-नायक)

टॅग्स :tourismपर्यटनTravelप्रवास