भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक थायलॅंडला भेट देतात. कारण एकतर थायलॅंड जवळ आहे. दुसरं थायलॅंडमध्ये स्वस्तात सुंदर सुंदर ठिकाणांना भेट देता येते. वेगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठीही थायलॅंड अधिक लोकप्रिय आहे. थायलॅंड अशाच काही वेगळ्या रोमांचक ठिकाणांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जेणेकरून तुम्ही थायलॅंडला जाणार असाल तर तुम्ही या गोष्टी एन्जॉय करू शकाल.
मजेदार स्नेक फॉर्म
चालता चालता रस्त्याने जर साप समोर आला तर काय होतं हे सर्वांनाच माहीत आहे. पण थायलॅंडमधील स्नेक फॉर्मचा नजारा पाहून सर्वांचा श्वास रोखला जातो. केवळ स्टाफच नाही तर पर्यटकही इथे सापांसोबत खेळताना दिसतात. अर्थातच हे ठिकाण थोडं भयानक आहे. पण इथे येऊन तुमची सापाची भितीही दूर होऊ शकते.
जगातल्या सर्वात मोठ्या रेस्टॉरंटमध्ये डिनर करा एन्जॉय
येथील रॉयल ड्रॅगन रेस्टॉरंट हे जगातलं सर्वात मोठं रेस्टॉरंट आहे. जिथे एकत्र ५ हजार लोक एकत्र बसू शकतात. १ हजार तर येथील स्टाफ आहे. जे सकाळपासून सायंकाळपर्यंत ग्राहकांना सेवा देतात. डिनरसोबत म्युझिक, डान्सिंग आणि बॉक्सिंगसारख्या इतरही अॅक्टिव्हिटी एन्जॉय करू शकता.
नशीब बदलू शकतं हे मार्केट
हे नॉर्मल मार्केटपेक्षा थोडं वेगळं मार्केट आहे. खाण्या-पिण्याच्या आणि गिफ्ट आयटमसोबतच लोक इथे गुडलकसाठी येतात. रविवारी मार्केटमध्ये सर्वात जास्त गर्दी असते. इथे लोक गुडलक ठरणाऱ्या वस्तूंची खरेदी करतात.
ट्री हाऊसमध्ये मिळेल अनोखं अॅडव्हेंचर
जंगलात फिरण्यासोबतच अॅडव्हेंचरचा आनंद घ्यायचा असेल तर ट्री हाऊस सर्वात चांगला पर्याय आहे. हे पक्ष्यांच्या घरट्यासारखं तयार करण्यात आलं आहे. ज्यात स्वीमिंग पूलपासून ते छत सगळंच वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आलं आहे.
थायलॅंडचा खास नजारा ड्रॅगन पॅलेसहून
थायलॅंडची राजधानी बॅंकॉकमध्ये एक फार वेगळं मंदिर आहे. या मंदिराची बाहेरील आकृती एका ड्रॅगनप्रमाणे आहे. हे मंदिर बॅंकॉकपासून केवळ ४० किमी अंतरावर आहे. मंदिरात गौतम बुद्धांची मूर्ती आहे. स्थानिक लोकांसाठी हे पवित्र स्थान असून इथे उत्सावात पूजा केली जाते.