फॅमिली ट्रिपला जायचंय? रायपूरमध्ये करू शकता ट्रिप एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 11:35 IST2019-07-05T11:26:26+5:302019-07-05T11:35:34+5:30
पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्याचा विचार असेल तर तुम्ही रायपूरला जाऊ शकता.

फॅमिली ट्रिपला जायचंय? रायपूरमध्ये करू शकता ट्रिप एन्जॉय
(Image Credit : MouthShut.com)
पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्याचा विचार असेल तर तुम्ही रायपूरला जाऊ शकता. रायपूर हे मध्य भारतातील राज्य छत्तीसगढमधील एक सुंदर शहर आहे. छत्तीसगढ हे राज्य नैसर्गिक सौंदर्याचाही गढ आहे. जंगल, डोंगरं, धबधबे, वेगवेगळे प्राणी इथे बघायला मिळतात. चला जाणून घेऊ या शहराची खासियत....
घाटराणी धबधबा
रायपूर शहरापासून ८५ किलोमीटर अंतरावर हा घाटराणी धबधबा आहे. छत्तीसगढ राज्यातील हा सर्वात मोठा धबधबा आहे. हा एक सुंदर पिकनिक स्पॉट आहे. इथे तुम्ही मित्रांसोबत आणि परिवारासोबत एन्जॉय करू शकता. या धबधब्याखाली एक नैसर्गिक पूलही आहे, ज्यात तुम्ही स्वीमिंगचा आनंद घेऊ शकता.
नंदनवन झू अॅन्ड सफारी
रायपूरमधील नंदनवन हे एक प्राणी संग्रहालय असण्यासोबतच एक संशोधन केंद्रही आहे. हे वनस्पती आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलं आहे. याला मानव निर्मित सर्वात मोठी सफारी सुद्धा म्हटलं जातं. ज्यात वेगवेगळ्या सफारींचा तुम्ही आनंद घेऊ शकता. प्रत्येक सफारीमध्ये २० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळाचा समावेश आहे.
गांधी उद्यान
रायपूरमध्ये शांतता प्रिय लोकांसाठी गांधी उद्यान हे परफेक्ट ठिकाण आहे. इथे तुम्ही रंगीबेरंगी फुले, गवताची मैदाने आणि वेगवेगळ्या वनस्पती बघू शकता. इथे मोठ्या प्रमाणात जॉगर्सही येतात. हा एक चांगला पिकनिक स्पॉट आहे.
विवेकानंद सरोवर
रायपूरच्या सर्वात सुंदर स्पॉटपैकी एक म्हणजे विवेकानंद सरोवर. इथे पर्यटक सुंदर नैसर्गिक नजारे बघू शकतात आणि बुद्ध तलावात बोटींगचा आनंद घेऊ शकतात. चारही बाजून हिरवीगार झाडे तुम्हाला वेगळाच आनंद देतात.